शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार मदत

By admin | Updated: March 8, 2015 01:15 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नोंद कृषी विभागाने योग्य पद्धतीने घ्यावी. नुकसान कमी असो वा जास्त असो,

गोंदिया : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नोंद कृषी विभागाने योग्य पद्धतीने घ्यावी. नुकसान कमी असो वा जास्त असो, फळपिकांचे असो अथवा भाजीपाला पिकाचे असो, झालेल्या नुकसानाची नोंद घेऊन एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी बैठक घेऊन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एन.के. लोणकर, सहायक आदिवासी आयुक्त सुरेश पेंदाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी उपस्थित होते.बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी सडक अर्जुनी येथे अंदाजे १०० हेक्टरवरील झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. तिरोडा व अर्जुनी मोरगावला पावसाचे जास्त प्रमाण असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी प्रामुख्याने घ्यावी असे सांगितले. या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १०० मि.मी. पाऊस पडला असून सर्व तालुक्यातील जवस, गहू, लाखोरी, ऊस, ज्वारी या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र व त्या प्रमाणात झालेल्या नुकसानाचे प्रमाण याबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सैनी यांनी आपली सादरीकरणाद्वारे प्रत्येक तालुक्यातील पीक लागवडीखालील क्षेत्र, पावसाचे प्रमाण, जीवित व वित्तहानी याबाबत माहिती दिली. सालेकसा तालुक्यातील पाहणी व नुकसानग्रस्त भागाची नोंद त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)