शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

By admin | Updated: November 11, 2016 01:32 IST

प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या नाम फाऊंडेशनकडून राज्यातील अनेक पिडीत कुटुंबांना मदत देण्यात आली.

शिक्षक कर्मचाऱ्यांना पुढाकार : नाम फाऊंडेशनला दिला ४२ हजारांचा धनादेशगोंदिया : प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या नाम फाऊंडेशनकडून राज्यातील अनेक पिडीत कुटुंबांना मदत देण्यात आली. अत्यल्प पाऊस व सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या बोजाने वाकून गेलेल्या शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळत आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने गोंदियातील काही शिक्षक-कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी गोळा केलेल्या ४२ हजारांचा मदतीचा धनादेश बुधवारी (दि.९) नाम फाऊंडेशनच्या स्वाधीन करण्यात आला.कमी वयात वैधत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना सामाजिक आधार व जगण्याचे सामर्थ्य देण्यासाठी नामने पुढाकार घेतला. यापासून प्रेरणा घेऊन व सामाजिक जाणीवेतून बीड, मराठवाड्याचे भूमिपूत्र असणारे व गोंदियात शिक्षण, आरोग्य, महसूल, पोलीस आणि वनविभागात सेवा देणारे कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले होते. या चळवळीतून गोंदियावासी असलेल्या मराठवाड्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले. सर्वांनी एकत्रिपणे यथाशक्ती ४२ हजार रुपये जमा केले.९ नोव्हेंबर २०१६ ला माजलगाव येथे नाम फाऊंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके यांच्या निवासस्थानी ४२ हजार रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. यावेळी लक्ष्मण आंधळे, अशोक चेपटे, भीमराव आंधळे, अनंत शिंदे, माणिक राठोड, बंडू राठोड, धनंजय वाघ उपस्थित होते. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या आदिवासी व नक्षलप्रभावित गोंदियातील या कर्मचाऱ्यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या कामासाठी लक्ष्मण आंधळे, किशोर गर्जे, अशोक चेपटे, सदाशिव पाटील, चेतन उईके, युवराज बडे, युवराज माने, शिवाजी बडे, नारायण शिरसाट, चंद्रशेखर हेमके, परमेश्वर चिरले यांनी पुढाकार घेतला. याशिवाय गोंदियाचे नुतन बांगरे, फौजदार दराडे, ठाणेदार केंद्रे, प्रकाश घुगे, गोडबोेले, तिपोळे, कानगुले, तेजनकर, खेडकर, झाडे, राठोड, जाधव यांनीही सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)