शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

निस्वार्थ ‘चाळीशी’ला सलाम

By admin | Updated: July 16, 2016 02:06 IST

आई-वडिलांपासून राजकीय पार्श्वभूमी लाभलेली असताना कोणत्याही पदासाठी हपापलेपणा न करता गेल्या ४० वर्षांपासून राजकीय,

अशोक इंगळेंचा नागरी सत्कार : अनेक मान्यवरांचे गौरवोद्गार गिोंदिया : आई-वडिलांपासून राजकीय पार्श्वभूमी लाभलेली असताना कोणत्याही पदासाठी हपापलेपणा न करता गेल्या ४० वर्षांपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय राहून सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीभाव जपणारे गोंदियाचे माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांचा गुरूवारी सायंकाळी हृदयस्पर्शी नागरी सत्कार झाला. इंगळे यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील स्वागत लॉनमध्ये सायंकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यंत रंगलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, मध्यप्रदेशचे कृषीमंत्री गौरीशंकर बिसेन, स्वागताध्यक्ष खा.नाना पटोले, आ.राजेंद्र जैन, आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी मंत्री सुधाकर गणगणे, केवलचंद जैन, भरतभाऊ बहेकार, माजी आ.हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भेरसिंग नागपुरे, भजनदास वैद्य, माजी जि.प.अध्यक्ष अ‍ॅड.के.आर.शेंडे, नेतराम कटरे, राजे मुधोजी भोसले, महेश पुरोहित, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, भंडाराचे माजी नगराध्यक्ष बशीरभाई, विनोद अग्रवाल, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी नागरी सत्कार समितीच्यावतीने अशोक इंगळे आणि त्यांच्या धर्मपत्नीचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्याच्या जीवनकार्यावरील ‘झुंज’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना ना.बडोले म्हणाले, आपला अशोकभाऊ यांच्याशी खूप आधीपासून संबंध आला नसला तरी गेल्या १०-१५ वर्षात जो काही संबंध आला त्यात त्यांचे कार्य पाहता आले. त्यांच्या कार्याचाच हा खऱ्या अर्थाने सत्कार असल्याचे ते म्हणाले. आ.अग्रवाल म्हणाले, आयुष्याची ४० वर्षे नि:स्वार्थपणे समाजासाठी वाहून घेताना विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय राहिले. अशोकभाऊंना तसा राजकीयच नव्हे तर सामाजिक कार्याचा वारसा घरातून मिळाला. आपल्या आई-बाबांच्या विचारांना तडा जाईल असे काम त्यांनी कधीच न करता समाजासाठीच आपला जन्म झाला आहे, असे मानून नि:स्वार्थपणे सेवा केली. ते समाजसेवेचे प्रेरणास्त्रोत असल्याचे, आ.अग्रवाल म्हणाले. आ. राजेंद्र जैन म्हणाले, आम्ही लहानपणापासूनच अशोकभाऊंचे कार्य पाहात आहोत. केके सरांनी तर आम्हाला शिकवले आहे. सिव्हील लाईनचा कुठलाही सोहळा असो, त्याच्या नियोजनासाठी अशोकभाऊ रात्रदिवस ज्या पध्दतीने काम करतात तसे आयोजन गोंदिया शहरात कुठेच होत नाही. ते आम्हा सर्वाचे लाडके असून म्हणून गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने आणि खा.प्रफुल पटेल यांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करीत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष पुष्पक जसानी यांनी तर संचालन श्रीमती देशपांडे व दुलीचंद बुध्दे यांनी केले. यावेळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील चाहत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमात वात्सल्यधामच्या मुलांना अशोक इंगळे यांच्या हस्ते ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी) ैमान्यवरांनी आठवणींना दिला उजाळा यावेळी आ.गोपालदास अग्रवाल म्हणाले, अशोकराव हे माझे वर्गमित्र. आम्ही दोघेही वेगवेगळ्या राजकीय पक्षात असलो तरी पारिवारिक मतभेद आमच्यात कधीच राहीले नाही. विशेष म्हणजे त्यांच्या आईवडिलांनीही समाज आणि शहराला प्राधान्य देत कुटूंबाचा स्वार्थ बाजुला ठेवला. गेल्या ४० वर्षापासून आम्ही मित्र आहेत. परंतु जेव्हा काही महिन्यांपूर्वी माझ्याशी एक घटना घडली तेव्हा रुग्णालयात मला भेटायला आलेला माझा मित्र अशोक बघून बरे वाटले, हीच त्यांच्या कार्याची पुण्याई असल्याचे ते म्हणाले. मध्यप्रदेशचे कृषीमंत्री गौरीशंकर बिसेन यांनीही आपले अशोकभाऊंशी संबंध खूप जुने असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत हे आमच्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे. सिव्हील लाईनच्या भागात आपले आधीपासूनचे संबंध असल्याने त्यांच्याशीही मैत्रीची नाळ जुळली आणि आजतागायत ती टिकून असल्याचे ना.बिसेन म्हणाले.