शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राने गाठला लसीकरणाचा विक्रमी टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

आरोग्य केंद्रांतर्गत राजोली, इळदा, परसटोला, चिचोली, वडेगाव (बंध्या) हे ५ आरोग्य उपकेंद्र असून, हे सर्व आरोग्य उपकेंद्र आदिवासी बहुल, दुर्गम, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतात. या गावांच्या  सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह पोलीस पाटलांच्या योग्य सहकार्याने लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंडल व डॉ.कापगते यांच्या मार्गदर्शनात लसीकरण पथक प्रभारी राखी हाडगे यांच्या पथकाने नियमित लसीकरणाचे सत्र राबविले.

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी :  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे सत्र नियमित सुरू ठेवल्याने लसीकरणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आरोग्य केंद्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे विक्रमी प्रमाण गाठल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकू मंडल यांनी सांगितले. येथील आरोग्य केंद्रांतर्गत राजोली, इळदा, परसटोला, चिचोली, वडेगाव (बंध्या) हे ५ आरोग्य उपकेंद्र असून, हे सर्व आरोग्य उपकेंद्र आदिवासी बहुल, दुर्गम, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतात. या गावांच्या  सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह पोलीस पाटलांच्या योग्य सहकार्याने लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंडल व डॉ.कापगते यांच्या मार्गदर्शनात लसीकरण पथक प्रभारी राखी हाडगे यांच्या पथकाने नियमित लसीकरणाचे सत्र राबविले. परिणामी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, कोरोना लसीकरण सत्राची माहिती आरोग्य विभागाकडून एक दिवसापूर्वीच प्रकाशित करण्यात येत असते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिक योग्य वेळी उपस्थित होतात. लसीकरणामुळे कोरोनापासून संरक्षण होत असून, आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम किंवा धोका नाही, असे नागरिकांना आता पटले आहे. यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्र वडेगाव (बंध्या) येथे ९७ टक्के, परसटोला आरोग्य उपकेंद्र येथे ८८ टक्के, चिचोली आरोग्य उपकेंद्र येथे ९६ टक्के, इळदा आरोग्य उपकेंद्र येथे ६० टक्के, राजोली उपकेंद्र येथे ५५ टक्के, केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ९६ टक्के असे विक्रमी प्रमाणात लसीकरण झाल्याचे डॉ.मंडल यांनी सांगितले, तर काही गावे १०० टक्के लसवंत होत असल्याची माहिती दिली आहे.लवकरात लवकर लसीकरण करा - प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नागरिकांकडून लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, लवकरच १०० टक्के लसीकरण होणार, असा विश्वास आहे. मात्र, कित्येक भागातील नागरिक आजही लस घेत नसल्याचे, तसेच दुसरा डोस टाळत असल्याचे दिसत आहे. असे न करता आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर लसीकरण करा, असे डॉ.मंडळ यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या