शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

बीजीडब्ल्यू रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

दोन वर्षांपूर्वीच या रुग्णालयाच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे महत्त्व अधिक वाढले. मात्र या रुग्णालयातील सोयी सुविधांचा अभाव आणि माता व बालमृत्युचे वाढते प्रमाण यामुळे हे रुग्णालय सदैव चर्चेत राहते.

ठळक मुद्देप्रवेशाव्दारासमोर घाणीचे साम्राज्य : डासांचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रुग्ण आजारी पडल्यानंतर तो बरा होण्यासाठी रुग्णालयात दाखल होतो. मात्र येथील बाई गंगाबाई (बीजीडब्ल्यू) रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आणि आवारात घाणीचे साम्राज्य असल्याने येथे उपाचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील आदिवासीबहुल, दुर्गम आणि ग्रामीण भागातील गोरगरिब रुग्णांना नि:शुल्क आरोग्याची सुविधा मिळावी, यासाठी शासनाने येथे बीजीडब्ल्यू रुग्णालयाची स्थापना केली. सुरूवातीला १२० खाटांचे असलेले हे रुग्णालय आता २०० खाटांचे झाले आहे. महिला आणि बाल रुग्णालय असल्याने जिल्हाभरातून दररोज २०० हून अधिक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. दोन वर्षांपूर्वीच या रुग्णालयाच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे महत्त्व अधिक वाढले. मात्र या रुग्णालयातील सोयी सुविधांचा अभाव आणि माता व बालमृत्युचे वाढते प्रमाण यामुळे हे रुग्णालय सदैव चर्चेत राहते.रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम रुग्णालय प्रशासनाचे आहे. मात्र, या रुग्णालयाचा फेरफटका मारला असता रुग्णांच्या आरोग्याचे तर सोडाच प्रशासनाचा बोजवारा उडाला असल्याची बाब पुढे आली.प्रवेशाव्दारासमोर कचऱ्याचे ढिगारेबीजीडब्ल्यू रुग्णालयाची भव्य इमारत पाहुन कुणालाही एवढी सुंदर इमारत गोंदियात असल्याचे आश्चर्य वाटेल. मात्र जसे तुम्ही रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ पोहचाल तेव्हा इमारतीवरुन ठरविलेली कल्पना चूकीची ठरेल. प्रवेशव्दारासमोर मोठ्या प्रमाणात केरकचऱ्याचे ढिगार असून त्यावर डुकरांचा वावर असतो. नाल्यांचे सांडपाणी देखील तिथेच साचून असल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य कितपत सुरक्षित असेल याची कल्पना न केलेली बरीच.जबाबदारी कुणाचीस्वच्छतेची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेची आहे. तेवढीच जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. मात्र या दोघांचेही दुर्लक्ष झाले असल्याने रुग्णांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी आणि विविध संघटना सदैव तत्पर असतात. काही राजकीय पक्ष एखाद्या कामाचे श्रेय घेण्याची संधी सोडत नाही. मात्र बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या परिसरातील केरकचरा आणि घाणीचा विषय कुणीही गांभीर्याने घेत नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल