शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

तलावातील गाळ काढून दुरु स्तीची कामे करणार

By admin | Updated: June 2, 2017 01:24 IST

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना पाणीसाठे वाढविण्यासोबतच शेतीची उत्पादकता देखील वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

राजकुमार बडोले : शिवार संवाद सभेतून मजुरांशी संवादलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना पाणीसाठे वाढविण्यासोबतच शेतीची उत्पादकता देखील वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्यातील ४०० तलावांतील गाळ यावर्षी काढण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील दोन हजार तलावांतील गाळ काढून त्याच्या दुरु स्तीची कामे करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या तलाव खोलीकरणाच्या कामाला पालकमंत्री बडोले यांनी नुकतीच भेट देवून शिवार संवाद सभेतून मजुरांशी संवादसाधला, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पं.स. सभापती कविता रंगारी, जि.प. सदस्य शीला चव्हाण, पं.स. सदस्य राजेशकठाणे, सरपंच शारदा किरसान, सामाजिक कार्यकर्ते विलास चव्हाण, चेतन वडगाये, गटविकास अधिकारी लाकडे, सहायक पोलीस निरिक्षक केशव वाभळे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले म्हणाले, अडीच वर्षाच्या काळात राज्य शासनाने ११ हजार ५५ कोटी रु पये शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले आहे. पीक विम्यात सहा हजार ७३९ कोटी रूपये शेतकऱ्यांना दिले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात सुध्दा जलयुक्तमधून मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. पुढेही यातून कामे करून राज्य दुष्काळमुक्त करून टंचाई निवारण, सिंचनाची सुविधा व बेरोजगारांच्या हातांना कामे देण्यात येतील. येत्या दोन वर्षात सर्वांना घरे या अंतर्गतरमाई घरकूल योजना व प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत घरे देण्यात येतील. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळावेत, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.धान खरेदी केंद्रावर विक्र ी केलेल्या धानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचे सांगून बडोले म्हणाले, शेतकऱ्यांसाठी खताचा तुटवडा पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आली. शेतमजुरांचे जीवन कसे चांगले होईल, त्यांना घरे कसे देता येईल, याचे नियोजनसुध्दा करण्यात आले आहे.मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत या परिसरातील जास्तीत जास्त गावे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याभागातील तलावांचा गाळ काढून त्याचे पुनरूज्जीवन करण्यात येईल. पुरका तलावाचे प्रकल्पात रूपांतर करण्यासाठी त्याचे सर्वेक्षण करण्यात येईल. ज्या तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस मिळालेला नाहीत्यांना त्वरित बोनस देण्याची कार्यवाही करण्यात येईल. या गावाच्या परिसरात वन विभागाकडून तयारकरण्यात आलेले पाच वन तलाव डव्वा येथील जैवविविधता समितीकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तलावाच्या खोलीकरणाच्या कामावर असलेल्या मजुरांनी विविध समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. त्याची सोडवणूक करण्याबाबत त्यांनी शब्द दिला. यावेळी जवळपास २०० मजूर उपस्थित होते. विलास चव्हाण यांनी डव्वा परिसरातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना प्रास्ताविकातून अवगत करून दिले. उपस्थितांचे आभार चेतन वडगाये यांनी मानले.सर्व धान्य दुकाने होणार आॅनलाईनधान खरेदी केंद्रावर एकरी २० क्विंटल धान विकता येणार आहे. धानाचीआणखी उत्पादकता वाढून ती एकरी ४० क्विंटलपर्यंत कशी जाईल, याचे सुध्दा नियोजन कृषी विभागाच्यामाध्यमातून करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. सामान्य माणसांचे प्रश्न देखील सोडविण्यात येतील. स्वस्त धान्य दुकानातून होणारा काळाबाजार थांबूनपारदर्शकता आणून ही सर्व धान्य दुकाने आॅनलाईन करण्यात येतील. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही. धानाची वेळीच भरडाई करु न तो स्वस्त धान्यदुकानातून लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा तांदूळ देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.