शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘हाजराफॉल’चे आकर्षण, पण सुविधांचा अभाव

By admin | Updated: August 23, 2015 00:14 IST

जिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हटले की सर्वात आधी आठवते ते हाजराफॉल. छत्तीसगड सीमेकडे महाराष्ट्राच्या टोकावरील ...

विजय मानकर/रवी सोनवणे  सालेकसाजिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हटले की सर्वात आधी आठवते ते हाजराफॉल. छत्तीसगड सीमेकडे महाराष्ट्राच्या टोकावरील दरेकसापासून १ किलोमीटर आणि सालेकसापासून १० किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा सध्या गोंदिया जिल्ह्यातीलच नाही तर पूर्व विदर्भातील आणि छत्तीसग, मध्यप्रदेशातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. मात्र या ठिकाणी पर्यटकांसाठी आणखी सुविधा दिल्यास या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. यातूनच अनेकांना स्वयंरोजगार मिळू शखतो.दरेकसा परिसरातून वाहत असणारे सर्व नदी-नाले एकत्र येवून त्यांचे पाणी उंच पहाडावरून खाली पडते. धबधब्याचे हे दृश्य मन प्रफुल्लित करणारे असते. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर येऊन काही क्षण निवांत घालविण्यासाठी साहजिकच पर्यटकांचे पाय इकडे वळतात. पावसाळा सुरू होताच धनेगाव, कोपालगड व दलदलकुही या तिन्ही नाल्यांचा त्रिवेणी संगम होवून हाजराफॉलवरील पहाडावर एकाच ठिकाणी पाणी एकत्रित होते व ते पाणी तेथील डोहातून खाली कोसळते. सुरूवातीला पडणारे पाणी गढूळ व लाल-पिवळ्या रंगाचे असते. परंतु जसजसा गढूळपणा दूर होतो, तसतशी पाण्यात शुभ्रता वाढते आणि हाजराफॉलचे सौंदर्य खुलत जाते. पूर्व भागातील सतपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेला हा धबधबा आॅगस्ट महिन्यात जास्तच आकर्षक बनतो. मोठ्या हिरव्या-काळ्या गलिच्यावरून कुणी सतत दूध सोडत आहे की काय असा भास तिथे होतो. या धबधब्याचे पाणी खाली पडून एका डोहात जमा होवून नंतर ते कुआढास नाल्याच्या माध्यमातून वाघनदीला जावून मिळते. या सुविधा पुरविण्याची गरजयेथे येणारे पर्यटक दूरवरून येतात. त्यामुळे त्यांना येथे लघुशंका, शौचालयाची सोय कुठेच नाही. यात महिला पर्यटकांची कुचंबना होते. येथील नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे बागडणाऱ्या मुलांना भूक लागतो. त्यामुळे येथे त्यांना खाण्यासाठी कोणतेही नाविन्यपूर्ण गोष्टी मिळत नाहीत. अल्पोपहाराचीही सोय येथे नाही. एखादी भुट्ट्याची गाडी, चिप्सचे पाकिट विकणारा किंवा चहावाला फिरताना दिसतो. पण शांतपणे बसून काही खाण्यासाठी येथे प्रशासनाने सोय करावी अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करीत आहेत.या ठिकाणी साहसी खेळांसाठी जी सोय केली आहे त्याचप्रमाणे या निसर्गरम्य ठिकाणी चांगले गार्डन विकसित केले जाऊ शकते. त्या गार्डनमध्ये झुले, घसरणपट्ट्या व इतर खेळ, मोठ्यांना बसण्यासाठी बाकडे, प्राण्यांच्या प्रतिकृती असे बरेच काही करणे शक्य आहे. त्याची देखभाल वन समितीकडे ठेवल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन होऊ शकते.स्वत:च्या चारचाकी वाहनाने हाजराफॉलला येणे सर्वांनाच शक्य नसते. त्यामुळे अनेक पर्यटक रेल्वेने हे स्थळ गाठतात. दरेकसा स्थानकावर आल्यानंतर तेथून हाजराफॉलला जाण्यासाठी कोणतेच वाहन उपलब्ध नसते. त्यामुळे पायीच एक किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. वृद्ध, अपंग पर्यटकांची अशावेळी मोठी फजिती होते. त्यामुळे दरेकसा बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर आॅटोसारख्या वाहनाची सोय करणे गरजेचे आहे.साहसी खेळ झाले आकर्षणयेथे मुलांसाठी विविध साहसी खेळ आणि कसरती करण्याचे साधन येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे हा परिसर आता मुलांसाठीसुध्दा आकर्षणाचे केंद्र बनले आहे. यात बरमा ब्रिज, मल्टीवाईन ब्रिज, व्ही शेपब्रिज, कमांडो नेट या खेळांचा समावेश आहे. पर्यटन व इको टूरिजम विकास योजनेंतर्गत खेळांसाठी अनेक साधन उपलब्ध आहेत. आनंद घ्या, पण नसते साहस नको!सालेकसा-दरेकसा मार्गावरून हाजराफॉल परिसरात प्रवेश करताच हिरवीगार वनराई, विविध औषधी गुणांनी परिपूर्ण असलेले वृक्ष, असंख्य जातीची लहान-मोठी झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. दूरूनच हाजराफॉल बघून मन प्रफुल्लीत होते. जवळ परिसरात गेल्यावर धबधब्यातून पाणी तलावात पडताना त्यातून पाण्याचे उडणारे तुषार शेकडो मीटर दूरपर्यंत पसरतात. ते शरीराला स्पर्शून नवचेतना निर्माण करतात. पर्वतराजीचे मनोहारी दृश्य सतत बघावेसे वाटते. याशिवाय परिसरात फिरायला मोकळा परिसर व शुद्ध प्राणवायूने हे स्थळ आहेत. काही अंतरावरून गेलेला मुंबई-हावडा रेल्वे मार्ग, त्यावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या धबधब्यातून निर्माण होणाऱ्या संगीताला चांगलीच साथ देतात. शांत, निरव जंगल परिसरात कोणाकडून येणाऱ्या एखाद्या पक्ष्याचे किंवा प्राण्याचे आवाज अचानक कानावर पडताना वेगळीच अनुभूती झाल्याशिवाय राहात नाही. या संपूर्ण नैसर्गिक गोष्टींचा आनंद घेताना नसते साहस कोणी करू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे, अन्यथा ते अंगलट येऊ शकते.