शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शुभेच्छांच्या आड प्रचार

By admin | Updated: January 2, 2017 00:43 IST

नववर्षाचा पहिलाच दिवस असल्याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या आड नगर परिषद निवडणुकीच्या

मिरवणुकांनी दणाणले शहर : उमेदवार पोहोचले घरोघरी गोंदिया : नववर्षाचा पहिलाच दिवस असल्याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या आड नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी मतरादांची भेटगाठ घेऊन प्रचार करून घेतला. या भेटीगाठीच्या नादात निघालेल्या मिरवणुकांनी शहर दणाणले होते. तर उमेदवार घरोघरी पोहचून नववर्षाच्या शुभेच्छा देत त्या आड आपल्यासाठी मत मागताना दिसले. रविवार सुटीच्या दिवस असल्याने सर्वच घरी मिळतात. त्यात नववर्षाचा पहिला दिवस सुटीचा आल्याने उमेदवारांनी हीच संधी साधून नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या आड मतदारांच्या भेटीगाठी करून घेतल्या. सुटीचा दिवस असल्याने रिंगणातील उमेदवारांच्या मिरवणुकाच शहरातील प्रत्येकच भागात दिसून येत होत्या. प्रत्येकच उमेदवार नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने मतदारांच्या घरी पोहचत असल्याचेही दिसून आले. तर त्यांच्या या मिरवणुकांनी शहरच दणाणून गेले होते. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांसह स्थानिक पक्षांनीही उडी घेतल्याचे दिसत आहे. शिवाय अपक्ष उमेदवारांचीही चांगलीच संख्या असल्याने निवडणूकीत चुरस वाढली आहे. सर्वच आपापल्या भागात जमलेले असल्याने कोण हात मारेल याचा नेम नाही. करिता जास्त मेहनत करून मतदारांत आपली ओळख निर्माण करण्यासाठी उमेदवारांकडून चकरा मारल्या जात आहेत. एकदा मतदारांच्या नजरेत बसण्यासाठी उमेदवारांची ही धावपळ सुरू आहे. त्यातून भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. ठीक सहा दिवसांनी म्हणजेच पूढच्या रविवारी (दि.८) नगर परिषदेची निवडणूक होत आहे. त्यातच नववर्षांची चांगलीच संधी चालून आली व उमेदवारांनी ती ‘कॅश’ ही केली. नववर्षाच्या शुभेच्छा देण्याचे निमित्त साधत उमेदवारांनी ही प्लानींग केल्याचेही दिसून येत आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने मतदारही घरीच भेटल्याने उमेदवारांच्या भेटीगाठीही घडल्या. (शहर प्रतिनिधी) - सकाळपासूनच दौरे सुरू नववर्षाचा पहिलाच दिवस व तोही सुटीच्या दिवशीच आल्याने या दिवसभरात प्रभागातील दौरा आटोपण्यासाठी उमेदवार सकाळपासूनच प्रभागात निघाले होते. रविवारची सुटी असल्याने सर्वांची भेट घेण्यासाठी हाच चांगला दिवस होता. पुढच्या रविवारी निवडणुकाच असल्याने हाच रविवार कॅश करण्यासाठी उमेदवारांची धावपळ दिसली. काही उमेदवारांनी तर रॅलीचेच आयोजन केल्याचेही दिसले. पार्ट्यांचे जोमात आयोजन ३१ डिसेंबर रोजी शनिवार आल्याने व शनिवारी काहींना नॉनवेज जमत नसल्याने ३१ डिसेंबरची पार्टी रविवारी ठरविण्यात आली. रविवारी मनसोक्त आनंद लुटायचा याच हेतूने रविवारी चांगल्याच पार्ट्यांचे आयोजन करण्यात आल्याचेही कळले. सध्या सर्वत्रच पार्ट्यांचे आयोजन उमेदवारांकडून केले जात आहे. हॉटेल, ढाबे व बार मध्ये सध्या निवडणुकांच्याच पार्ट्या सुरू असल्याचेही दिसते. आता मोजकेच दिवस असल्याने पार्ट्यांनाही उधाण येणार आहे.