शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

हळदीघाट मकरसंक्रांत यात्रा साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST

सडक-अर्जुनी : तालुक्यातील हळदीघाट येथे दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त भरणारी यात्रा या वर्षी कोरोना संक्रमणामुळे अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आली आहे. ...

सडक-अर्जुनी : तालुक्यातील हळदीघाट येथे दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त भरणारी यात्रा या वर्षी कोरोना संक्रमणामुळे अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आली आहे. हळदीघाट देवस्थान समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

चूलबंद नदीघाटावर हळदीघाट येथे जवळपासची ४-५ गावे मिळून दरवर्षी यात्रेचे आयोजन करतात. येथे भाविक नंदीपिंडी तयार करून पूजाअर्चना व स्नान करून गूळ-पोहे व तिळाचे लाडू खाऊन‌ मकरसंक्रांत साजरी करतात. ही परंपरा पिढ्यानपिढ्यापासून चालत आली आहे. सर्वप्रथम १४ जानेवारी रोजी घटस्थापना व १५ जानेवारी रोजी घट विसर्जन व महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात येत होते. हळूहळू हळदीघाट येथे यात्रेचे स्वरूप निर्माण झाले. त्यानंतर सन २००५ मध्ये गहाणे यांनी या देवस्थानात हनुमान, गणपती, विठ्ठल-रखुमाई व शंकराच्या मूर्तीची स्थापना केली. हळदीघाट येथे दरवर्षी मकरसंक्रांतीला लाखो भाविक येऊ लागले आणि या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप आले. सन २००९ मध्ये गोपीनाथ गहाणे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सुरेश गहाणे जय दुर्गामाता देवस्थान समितीचे अध्यक्ष झाले व आपल्या वडिलांची परंपरा त्यांनी पुढेही सुरूच ठेवली. २०१३ मध्ये देवस्थानचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. दरवर्षी समितीच्या वतीने १५ जानेवारी रोजी यात्रेचा समारोप करून महाप्रसाद वाटप केले जाते. महाशिवरात्रीला ९ दिवस भागवत सप्ताहाचे आयोजन करून महाप्रसाद वाटप केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे यात्रा अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष सुरेश गहाणे व उपाध्यक्ष गणपत मोडकू झिंगरे यांनी सांगितले. मात्र यात्रेत येणारे दुकानदार ठरावीक अंतर ठेवून आपली दुकाने लावू शकतात व सामानाची विक्री करू शकतात.

.....

१९७० पासून झाली यात्रेची सुरुवात

१९७० मध्ये साकोली तालुक्यातील ग्राम विर्शी येथील गोपीनाथ गहाणे यांची पत्नी आई-वडिलांना एकुलती एक मुलगी असल्यामुळे ते घाटबोरी येथे सन १९७० मध्ये स्थायिक झाले. त्यांनी सन १९७१ मध्ये चूलबंद नदीघाटावर हळदीघाट येथे १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्ताने पूजा-अर्चना केली. गहाणे यांच्या संकल्पनेतून तवाडे महाराज (भूगाव-मेंढा) यांच्या हस्ते दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.