शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गजबजू लागली गोंदियातली ‘चितारओळ’

By admin | Updated: August 24, 2015 01:45 IST

‘चितारओळ’ हे नाव कानी पडताच नागपुरातील मूर्तिकारांची वस्ती असलेली बोळ डोक्यात येते.

मूर्तिकारांनी मांडले बस्तान : मातीचा देव घडविण्यास झाली सुरुवातगोंदिया : ‘चितारओळ’ हे नाव कानी पडताच नागपुरातील मूर्तिकारांची वस्ती असलेली बोळ डोक्यात येते. मूर्तिकारांचे निवास असल्याने नागपूरकरांचे कान्होबा, गणेशोत्सव, शारदा व दुर्गास्थापना हे सण येथूनच सुरू होतात. याच चितारओळीचे स्वरूप सध्या येथील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक ते इंगळे चौक या मार्गाला आहे. लगतच्या परिसरातील मूर्तिकार मागील कित्येक वर्षांपासून येथेच आपले बस्तान मांडत असल्याने मूर्त्यांचे बुकिंग करण्यासाठी गोंदियातली ही ‘चितारओळ’ गजबजू लागली आहे. जिवती झाली की हिंदूधर्मियांच्या सणांना सुरूवात होते. एका पाठोपाठ एक सण येतात व हिंदू धर्मियांसाठी हा काळ चैतन्याचा असतो. यात कान्होबापासून मूर्ती पूजनाचे सण सुरू होता. त्यानंतर गणपती, शारदा, दुर्गा, भुलाबाई व लक्ष्मीपूजन या क्रमाने मूर्ती पूजनाचे मुहूर्त असतात. शहरात मोठ्या संख्येत खासगी व सार्वजनिक स्तरावर हे उत्सव साजरे केले जात असल्याने येथील उत्सवांची लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यापर्यंत ख्याती आहे. तर या सणांची भव्यता बघण्यासाठी या राज्यांतील भाविक शहरात येतात. नेमकी हीच बाब हेरून परिसरातील मूर्तिकार सध्या आपल्या परिवारासह सध्या सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिर ते इंगळे चौक व परिसरात ठाण मांडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून हे मूर्तिकार येत असल्याने त्यातही आपल्या इमारत व जागेत त्यांच्या हातून देव घडत असल्याने या रांगेतील रहिवासी स्वेच्छेने आपली जागा त्यांना देतात. यामुळे मूर्तिकारसुद्धा हक्काने आता येथे येत असून आपला व्यवसाय करतात. येत्या ५ सप्टेंंबर रोजी जन्माष्टमी तर १७ सप्टेंबर रोजी गणपती स्थापनेचा मुहूर्त आहे. त्यामुळे आता मोजकेच दिवस असल्याने मूर्तिकार दिवस- रात्र एक करून मातीला आकार देण्यात रमले आहेत. विशेष म्हणजे येता-जाता तयार होत असलेल्या मुर्त्या बघून सिव्हील लाईंसवासीयांसह अन्य भागातील नागरिकसुद्धा आकर्षित होत आहेत. शिवाय ऐनवेळी धावपळ होत असल्याने आतापासूनच मूर्त्यांचे बुकिंग सुरू झाले आहे. आपली मूर्ती सर्वांपेक्षा वेगळी व बजेटमध्ये असावी यासाठी नागरिक मूर्तिकारांकडे बसून बुकिंग करून घेत आहेत. यामुळे दिवसभराच्या त्यांच्या ये-जामुळे गोंदियातली ही ‘चितारओळ’ सध्या चांगलीच गजबजू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)