शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वार्ड बांधकामाअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कोरोनाचा देखील प्रादुर्भाव असल्याने मेडिकलमध्ये दाखल होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील बाह्यरुग्ण तपासणी विभागात सध्या दररोज ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. विविध आजाराच्या रुग्णांची संख्या सुध्दा वाढत आहे. तर काही खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देमेडिकलमधील प्रकार : रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून येथील शासकीय महाविद्यालयातील (मेडिकल) दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मेडिकलच्या वार्डातील खाटा फुल झाल्याने रुग्णांवर चक्क जमिनीवर बेड टाकून उपचार केले जात असल्याचा प्रकार मंगळवारी (दि.७) उघडकीस आला. रुग्णांना दाखल करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने आता मेडिकल व्यवस्थापनासमोर सुध्दा पेच निर्माण झाला आहे.गोंदिया येथे मेडिकल कॉलेज सुरू होवून चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही इमारतीचे बांधकाम सुरू न झाल्याने मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. या दोन्ही रुग्णालयाची जागा अपुरी पडत असल्याने आता रुग्ण दाखल करण्याची समस्या निर्माण झाली आहे. मेडिकलमध्ये सध्या रुग्णांना दाखल करण्यासाठी वार्ड क्रमांक पाच हा एकमेव वॉर्ड आहे. या वार्डातील खाटांची क्षमता केवळ ३५ आहे. जिल्हाभरातून येथे दाखल होणाºया रुग्णांची संख्या पाहता ते फारच अपुरे आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कोरोनाचा देखील प्रादुर्भाव असल्याने मेडिकलमध्ये दाखल होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील बाह्यरुग्ण तपासणी विभागात सध्या दररोज ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. विविध आजाराच्या रुग्णांची संख्या सुध्दा वाढत आहे. तर काही खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे येथील वार्डात जागा अपुरी पडत असल्याने रुग्णांना खाली बेड टाकून उपचार केले जात असल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.या प्रकारावर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सुध्दा संताप व्यक्त केला. यासंदर्भात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वार्डात क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे.रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले. तेथे शासकीय दरानुसारच रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. या ठिकाणी रुग्णांना जाण्यास सांगितले जात आहे. मात्र रुग्ण जाण्यास तयार नसल्याने येथील वार्डात गर्दी वाढली असल्याचे सांगितले.प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले बांधकाममेडिकलमध्ये रुग्णांना दाखल करण्यासाठी वार्डाची समस्या लक्षात घेता वर्षाभरापूर्वी बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या आवारात चार वार्डचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. या वार्डाचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाला करायचे होते. मात्र यासाठी शासनाची प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने हे बांधकाम रखडले असल्याची माहिती आहे.लोकप्रतिनिधींनी दिला होता इशारादोन महिन्यांपूर्वीच स्थानिक लोकप्रतिनिधीनी मेडिकल आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाचा दौरा करुन रुग्णांवर खाली बेड टाकून उपचार केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र मंगळवारी मेडिकलमध्ये नेमका हाच प्रकार घडल्याने आता लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय