शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नव्या फायर स्टेशनला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: May 22, 2015 02:06 IST

गोंदियातील नव्या फायर स्टेशनला ग्रीन सिग्नल मिळाले असून या स्टेशनचे निर्माण कार्य आता लवकरच सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोंदिया : गोंदियातील नव्या फायर स्टेशनला ग्रीन सिग्नल मिळाले असून या स्टेशनचे निर्माण कार्य आता लवकरच सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील रिंग रोडवरील मजारच्या मागे यासाठी आरक्षीत जागेवर हे नवे फायर स्टेशन तयार केले जाणार आहे. शिवाय यातच कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्सही तयार केले जाणार आहे. शहरात आजघडीला एकच फायर स्टेशन असल्याने शहराच्या वाढत्या लोकसंख्या व क्षेत्राला लक्षात घेता त्यावर ताण व जबाबदारी वाढत चालली आहे. शिवाय येथील फायर स्टेशनमधूनच अवघ्या जिल्ह्यातील आगजळीच्या घटनांवर नियंत्रण मिळविले जाते. त्यामुळे बदलत्या स्थितीनुसार शहरात एक दुसरे फायर स्टेशन तयार करण्याचा पालिकेचा विचार होता. त्यासाठी नगर विकास मंत्रालय मुंबईकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हे नवे फायर स्टेशन तयार करण्यासाठी पालिकेने रिंग रोडवर असलेल्या मजारच्या मागची एक जागा आरक्षीत करून ठेवली होती. रिंगरोडवर तयार करण्यात येणाऱ्या या फायर स्टेशनच्या माध्यमातून पुला पलीकडील भागातील आगजळींच्या घटनांवर नियंत्रण मिळविणे जास्त सुविधाजनक ठरणार असा पालिकेचा यामागचा दृष्टीकोन होता. त्यामुळेच हे नवे फायर स्टेशन पुला पलीकडे तयार करण्याचा प्रस्ताव होता. शिवाय हे फायर स्टेशन तयार झाल्यास विद्यमान फायर स्टेशनवरील ताण कमी होणार यात शंका नाही. मध्यंतरी पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष मुंबईला गेले असता त्यांनी नगर विकास मंत्रालयात पडून असलेली फायर स्टेशनची फाईल मंत्रालयात पाठविली. त्यामुळे या नव्या फायर स्टेशनसाठी एक कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता लवकरच नव्या फायर स्टेशनचे काम सुरू करण्यात काही अडचण येणार नाही. हे फायर स्टेशन झाल्यास अवघ्या जिल्ह्यासाठीच सोयीचे होणार यात शंका नाही. (शहर प्रतिनिधी)