शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

हिरव्या पालेभाज्यांनी सजली बाजारपेठ

By admin | Updated: December 1, 2015 05:55 IST

जेवणाचा खरा मजा हिवाळ्यातच, असे घरच्या मोठ्यांकडून बोलले जाते. मात्र हे फक्त बोलण्या पुरतेच नसून ही

पालक, मेथी व चवळीची मागणी : पोपट, वाटाणा व तुरीची शेंग ६० रूपये किलो गोंदिया : जेवणाचा खरा मजा हिवाळ्यातच, असे घरच्या मोठ्यांकडून बोलले जाते. मात्र हे फक्त बोलण्या पुरतेच नसून ही जीवनातली एक वास्तवीकता आहे. कारण आजघडीला बाजारात प्रत्येकच दुकान हिरव्यागार पालेभाज्यांनी सजलेली दिसून येत आहे. पालेभाज्या महाग असल्या तरिही खाणारे मात्र खरेदी करतच आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात भाज्यांचे उत्पादन होत नसून या काळात भाज्या बाजारात दिसतही नाही. परिणामी मोजक्याच भाज्या खाऊन दोन वेळचे समाधान करून घ्यावे लागते. आज भाज्यांचे दर बघता घाम फुटत असला तरी महागाईमुळे जेवण तर सोडता येणार नाही. परिणामी आहे त्या परिस्थितीशी जुळवून भाज्यांची खरेदी करावीच लागते. त्यात बाजारात गेल्यावर जे मिळेल ते घ्या अशी स्थिती असते. सध्या हिवाळा सुरू असून हिरव्या भाज्या बाजारात येऊ लागल्याने प्रत्येकच दुकान या पालेभाज्यांनी सजलेली दिसून येत आहे. वर्षभर मिळणाऱ्या भाज्या खाऊन नाकतोंड एक करणाऱ्यांसाठी मात्र ही एक पर्वणीच आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्यांची विक्री होत असल्याने विक्रेतेही खुश आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हिरव्या भाज्या खाण्यासाठी डॉक्टरही सांगतात. त्यामुळे हिरव्या भाज्यांकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. आज बाजारात मेथी, पालक, लालभाजी, बथवा भाजी, चवळी भाजीची धूम आहे. भाजी तर भाजी शिवाय अन्य पदार्थ तयार करता येत असल्याने हिरव्या भाज्यांना चांगलीच पसंती आहे. त्यामुळेच गोंदियावासी भाज्यांचा आनंदही चांगलाच घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)शेंगा सर्वात महागड्या४तुर, वाटाणे (मटर) व पोपटाच्या दाण्यांची उसळ म्हणताच तोंडाला पाणी सुटते. हिवाळ्यातील या सर्वात फेव्हरेट पदार्थांमधील एक पदार्थ आहे. बाजारात तुर, वटाणे व पोपटीची शेंग आली आहे. हिवाळ््या नंतर या शेंगा दिसत नाही. विशेष म्हणजे यांच्या आवडीनुसार त्यांचे भावही सध्या बाजारात सवार्धिक वधारलेले दिसून येत आहे. अन्य भाज्यांच्या तुलनेत शेंगा महागड्या असून तूर व पोपट ६० रूपये किलो दराने तर वाटाण्याची शेंग ५० रूपये किलो दराने विकली जात आहे.