शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षण महाविद्यालयांना अनुदान

By admin | Updated: May 20, 2014 23:43 IST

राज्यात उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत शासन मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनेक वर्षापासून अनुदानास पात्र ठरविण्यासाठी सार्थ पाऊल उचलण्यात आले नाही.

 पात्रतेची प्रतीक्षा

आमगाव : राज्यात उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत शासन मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनेक वर्षापासून अनुदानास पात्र ठरविण्यासाठी सार्थ पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. राज्यात भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियंत्रणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे ध्येय तंत्रशिक्षणातून पूर्ण करण्यात येत आहे. महाराष्टÑ राज्य तंत्रशिक्षणातून शासनाने पदविका, पदवी व पदव्युत्तरातील अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. यासाठी शासनाने शासकीय व खासगी संस्थांनाना शिक्षणासाठी लागणार्‍या सोईची उपलब्धता पुरवून घेतली. राज्यात २१४५ विद्यालयातून कुशलतेने तंत्रज्ञानातील तंत्रज्ञ घडविण्याचे कार्य विद्यालयातून करण्यात येत आहे. या महाविद्यालयांमध्ये तंत्रशिक्षण विभागाने ठरविलेल्या मापदंडानुसार खासगी व शासकीय महाविद्यालयामध्ये सर्वच पदांची पूर्तता करण्यात आली. यात शासकीय महाविद्यालये अनुदानित असल्याने यात कर्मचारीवृंद हा स्वत:ला सुरक्षित समजत आहे. परंतु खासगी संस्थांची अवस्था फार बिकट आहे. या शिक्षण संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या दृष्टीने शासनाने व तंत्रशिक्षण विभागाने कधीही पुढाकार घेवून त्यांच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कायम अनुदान श्क्षिण संस्थानमधील कर्मचार्‍यांचे भवितव्य उजाळले नाही. संस्था चालकांकडून मिळणार्‍या मानधनावर त्यांचे उदरनिर्वाह सुरू आहे. या संस्थामधील कर्मचार्‍यांची वेतन रोजंदारी मंजुरीच्यापेक्षाही कमी आहे. सलग दैनंदिन शैक्षणिक कार्य करुन सुद्धा कर्मचार्‍यांना मिळेल त्या वेतनावर कार्य करावे लागत आहे. तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी शासनाने कायम अनुदानित संस्थांना अनुदान देईल या आशेवर कर्मचार्‍यांनी शैक्षणिक कार्यात आपले आयुष्य झिजविले, परंतु कमी मिळणार्‍या वेतनावर कुटुंब मात्र उघड्यावर पडले आहे. कर्मचारी एकनिष्ठपणे कार्यकुशलतेने आपले कर्तव्य बजावून शासनाच्या धोरणाला सार्थक ठरवित आहे. आता हेच कर्मचारी शासनाकडे आशेने बघत आहेत. (शहर प्रतिनिधी)