६००० घेतले : शासकीय विहीर बांधकाम प्रकरणआमगाव : तालुक्यातील तिगाव येथे शासकीय जवाहर विहीर बांधकाम बिलाचे देयक काढण्यासाठी रोजगार सेवकाच्या माध्यमाने ६ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ग्रामसेवक एस.एस. सिंगनधुपे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.तालुक्यातील तिगांव येथे हरिचंद भैय्यालाल बारेवार या शेतकऱ्याने शासकीय विहीरीचे बांधकाम शेतात केले. या बांधकामावरील १ लाख २८ हजार मंजुर निधीपैकी ९४ हजार ६५७ रुपयांचे देयक ग्रामपंचायतकडून घेणे बाकी होते. या मंजुर निधीतील कमिशन स्वरुपात ग्रामसेवक व रोजगार सेवकाने १० हजार रुपयांची मागणी केली. परंतु सदर देवाण-घेवाण ६ हजार रुपयांवर ठरले. दिनांक २६ आॅगस्टला रोजगार सेवक धनपाल कटरे यांच्यामार्फत ग्रामसेवकाने ६ हजार रुपयांची लाच फिर्यादीकडून स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली. आरोपीविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला.(शहर प्रतिनिधी)
लाच घेताना ग्रामसेवकाला अटक
By admin | Updated: August 28, 2015 01:43 IST