शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक युनियनचे असहकार आंदोलन सुरूच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:34 IST

सिरपूरबांध : ग्रामसेवक हा ग्रामीण जनता व प्रशासनाचा दुवा म्हणून काम करत असून ग्रामीण विकासात यांचा मोठा वाटा असतो. ...

सिरपूरबांध : ग्रामसेवक हा ग्रामीण जनता व प्रशासनाचा दुवा म्हणून काम करत असून ग्रामीण विकासात यांचा मोठा वाटा असतो. शासनाच्या योजना राबविण्याकरिता ग्रामसेवक हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात; परंतु शासन, प्रशासनातर्फे अन्याय होत असल्यामुळे ग्रामसेवक युनियनतर्फे विविध मागण्यांची पूर्तता करण्यासंबंधी १६ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.

देवरी तालुक्यातसुद्धा ग्रामसेवकांनी पं. स. देवरी येथे असहकार ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ग्रामसेवक युनियनतर्फे मुख्य कार्यकारी गोंदिया यांना आपल्या मागण्यासंबंधी निवेदन देत असहकार आंंदोलनाला सुरुवात केली आहे. ग्रामसेवक संवर्गावर एकतर्फी कार्यवाही करणे, ग्रामसेवक श्रीवास्तव महागाव यांचे केलेले निलंबन मागे घेण्यात यावे, पदोन्नती प्रकरणे त्वरित निकाली काढणे, कोरोनाने मृत्यू पावलेल्या ग्रामसेवकांचे प्रस्ताव शासनास पाठविणे, स्थायी कर्मचारी प्रकरणे निकाली काढणे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासन, प्रशासनाने या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर ३० ऑगस्टपासून ग्रामपंचायत अभिलेख बंद करून चावी, शिक्के गटविकास अधिकारी यांना सुपूर्द करून बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ग्रामसेवकाच्या आंदोलनामुळे ग्रामीण जनतेला दाखले मिळत नसल्यामुळे विविध योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ग्रामीण विकासकामांनासुद्धा फटका बसत आहे. पं.स.देवरी येथे ठिय्या आंदोलनात तालुका अध्यक्ष नरेंद्र राठोड, उपाध्यक्ष गणेश मुनिश्वर, सचिव विलास गोबाडे, मुंडे, आशिष कावळे, वाय. एस. मानापुरे, एस. ए. मेश्राम, वाघमारे, खोटेले, मेश्राम, कैलुके, शिवणकर सहभागी झाले आहेत.