शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक उतरले रस्त्यावर

By admin | Updated: September 16, 2015 02:15 IST

आपल्या विविध मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या बॅनरखाली जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी ....

धरणे आंदोलन : १ आॅक्टोबरला ग्रा.पं.च्या किल्ल्या बिडीओंना सोपविणारगोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या बॅनरखाली जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास १ आॅक्टोबर रोजी ग्रा.पं.च्या किल्ल्या गटविकास अधिकाऱ्यांना देणार असल्याचा इशारा ग्रामसेवकांनी दिला. ग्रामसेवक युनियनने केलेल्या मागणीत योगेश रूद्रकार यांना तातडीने कामावर रूजू करा, ग्रामविकास अधिकाऱ्यांना पदोन्नतीतून विस्तार अधिकाऱ्यांची पदे भरा, ग्रामसेवकांच्या पदोन्नतीने ग्रामविकास अधिकारी पद भरा, सन २०११ ते २०१४ या वर्षात आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून एकाची निवड करा, १२ व २४ वर्षाचे कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढा, अस्थायी ग्रामसेवकांना स्थायी करा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सन २०१३ व २०१४ ची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करा, नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेल्या कंत्राटी ग्रामसेवकांचे सीपीएफअंतर्गत कपात करण्यात आलेल्या रकमेचा भविष्य निर्वाह निधीत वळती करा, ३ वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना सुरक्षा निधीचे १० हजार रूपये परत द्या, आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढा, अश्या विविध मागण्यांचा समावेश होता. सदर धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, एम. रहिले, पी.जी. ठाकरे, रेखा ठाकरे, वाय.डी.पुंड, आर.बी. बावनकुळे, सी.आर. काडगाये, वाय.एस. मानापुरे, पी.सी. मेश्राम, सुनिल पटले, वाय.के.रूद्रकार, डी. एन. शहारे, के.एम. रहांगडाले, एन.एल. ब्राम्हणकर, एल.एन. कुटे व जिल्ह्यातील इतर ग्रासेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)