शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींनी स्वच्छता उपक्रम राबवावेत

By admin | Updated: October 1, 2015 02:03 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली.

उषाताई मेंढे यांचे आवाहन : राष्ट्रीय स्वच्छता व गाडगेबाबा अभियानाचे उद्घाटन गोंदिया : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता अभियानात देखील लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छतेचा उपक्रम राबवावा, नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारी (ता.२९) राष्ट्रीय स्वच्छता अभियान व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या संयुक्त उद्घाटन सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी. कटरे, समाजकल्याण समितीचे सभापती देवराज वडगाये, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे, जि.प.सदस्य आणि राष्ट्रवादीचे गटनेता गंगाधर परशुरामकर, दुर्गा तिराले, सुरेश हर्षे, किशोर तरोणे, कमलेश्वरी लिल्हारे, श्यामकला पाचे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक माहिती, शिक्षण आणि संवाद तज्ज्ञ राजेश उखळकर यांनी केले. संचालन समाजशास्त्र तज्ज्ञ दिशा मेश्राम यांनी तर आभार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अधीक्षक एच.आर. गौतम, प्रभारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा लेखाधिकारी जितेंद्र येरपुडे, माहिती शिक्षण आणि संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये, स्वच्छता तज्ज्ञ सूर्यकांत रहमतकर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ बी.ओ. पटले, क्षमता बांधणी तज्ज्ञ देवानंद बोपचे, शालेय स्वच्छता तज्ज्ञ भागचंद रहांगडाले, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ तृप्ती साकुरे, मूल्यमापन व सनियंत्रण तज्ज्ञ विशाल मेश्राम, शोभा फटिंग, पाणी गुणवत्ता सल्लागार मुकेश त्रिपाठी, सचिन रोढी, उमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)