शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

By admin | Updated: August 27, 2015 02:05 IST

तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाडी येथे शासनाच्या निर्देशानुसार २४ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा झाली.

ग्रामसेवकाचे पलायन : हिशेब मागताच सोडली ग्रामसभापरसवाडा : तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाडी येथे शासनाच्या निर्देशानुसार २४ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा झाली. या सभेत सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला मागील वर्षाच्या जमा-खर्चाचा हिशेब मागितला. मात्र ग्रामसेवकाने ग्रामसभेतून पलायन केले. या प्रकारामुळे संतापलेल्या गावकऱ्यांना ग्रामपंचायतला कुलूप ठोकले. या प्रकाराची तक्रार गावकऱ्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केली. ग्रामसेवकाची योग्य चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याच अनुषंगाने गोंडमोहाडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच पौर्णिमा वळगाये होत्या. यावेळी प्रामुख्याने उपसरपंच सुभाष कावळे, ग्रामसेवक एन.डी. धुर्वे, ग्रा.पं. सदस्य प्रभा राऊत, पुष्पा बोपचे, धनवंता भगत, भूमेश्वर शेंडे, डॉ. चैतलाल भगत, पोमेश अंबुले, रमेश चौरे, राजू उईके, हेमंत ठाकरे, सुभाष अकरे, तुलसीदास भुजाळे व ग्रामवासीयांच्या उपस्थितीत ग्रामसभा सुरू झाली. या ग्रामसभेत मागील वर्षीचा जमा-खर्च, १४५ लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम याचा हिशेब मागितला असता ग्रामसेवक भांबाहून गेला व ग्रामवासीयांना चकमा देत सभेतून पलायन केले. काही काळ ग्रामवासीयांनी ग्रामसेवक येईल, या आशेने सभेत आपला वेळ काढला. मात्र ग्रामसेवक सभेतून पळाल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामवासीयांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. (वार्ताहर)