शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’च्या परिचरांना सरकारी गणवेशाचे वावडे

By admin | Updated: June 3, 2016 01:34 IST

कोणत्याही सरकारी कार्यालयात विशिष्ट सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी खास ‘ड्रेस कोड’ दिलेला असतो.

जिल्ह्यात ५२४ जण कार्यरत : प्रशासनाची मात्र डोळ्यावर पट्टीमनोज ताजने गोंदियाकोणत्याही सरकारी कार्यालयात विशिष्ट सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी खास ‘ड्रेस कोड’ दिलेला असतो. तो पोषाख हीच त्या व्यक्तीची ओळख असते. कार्यालयीन कामकाजाच्या शिस्तीचा हा एक भाग असतो. शिवाय त्यामुळे कार्यालयातील वातावरणही काम करण्यासाठी अधिक पोषक होते. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या तब्बल ५२४ परिचरांना आपल्या ड्रेस कोडचा चांगलाच विसर पडला आहे. काही दोन-चार बोटावर मोजण्याइतके परिचर सोडल्यास बहुतांश जण विविध कपड्यांवर आपली ड्युटी बजावताना दिसत आहेत.गोंदिया जिल्हा परिषदेत परिचरांची ५०४ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्ष ५२४ म्हणजे २० अतिरिक्त आहेत. गोंदियातील मुख्य जिल्हा परिषद इमारतीपासून तर पंचायत समित्या आणि उच्च माध्यमिक शाळांपर्यंत हे परिचय ड्युटी करीत आहेत. त्यांच्यासाठी पांढरे शर्ट आणि पांढरा पँट असा पोषाक आहे. वर्षातून एक वेळ त्यांना हा पोषाख घेण्यासाठी २५०० रुपये दिले जातात. शिवाय दर महिन्याला ५० रुपये धुलाई भत्ताही मिळतो. मात्र ५२४ पैकी १० टक्केही परिचर पांढऱ्या पोषाखात नसतात.‘काम कवडीचे नाही आणि फुरसत घडीची नाही,’ अशी या परिचरांची स्थिती असते. साहेबांनी बेल वाजविली त्यांच्यापुढे हजर व्हायचे, चहा-पाण्याची आॅर्डर, फाईल ने-आण किंवा एखाद्याला बोलवून आणणे यापलिकडे त्यांच्याकडे कोणतेही काम नसते. पण काही परिचरांना हे कामसुद्धा जड वाटते. त्यामुळे ते चक्क बाबूच्या खुर्चीवर बसून कार्यालयाच्या कॉम्प्युटरवर पत्ते खेळताना दिसून येतात. एखाद्या बाबूने फाईल घेऊन जाण्यास सांगितले तरी ते काम करताना करताना त्यांचे पाय जड होतात. त्यामुळे अनेक वेळा बाबूच साहेबांकडे फाईल्स घेऊन जात असल्याचेही चित्र जिल्हा परिषदेच्या काही विभागात पहायला मिळते.११२ परिचर होते अतिरिक्त !जिल्हा परिषदेला २०१२ मध्ये ३५ परिचरांची भरती करायची होती. मात्र प्रत्यक्षात १० अतिरिक्त म्हणजे ४५ परिचरांची भरती केली. त्यातच आॅक्टोबर २०१४ मध्ये शासनाने काढलेल्या जीआरमध्ये शाळांवरील (हायस्कूल) पटसंख्येनुसार परिचरांची पदे निश्चित करण्यास सांगितले. त्यामुळे तब्बल ११२ परिचर अतिरिक्त ठरले होते. तेव्हापासून दरवर्षी निवृत्त होणाऱ्या, निधन पावणाऱ्यांच्या जागी त्या अतिरिक्त परिचरांना समायोजित केले जात आहे. तरीही अजून २० परिचर अतिरिक्त आहेत.चालकही आपल्याच तोऱ्यातपरिचरांसोबत वाहन चालकांसाही ड्रेस कोड आहे. मात्र तेसुद्धा आपल्या पोषाखात दिसत नाहीत. केवळ राष्ट्रीय सण (१५ आॅगस्ट, २६ जानेवारी), महाराष्ट्र दिन अशा विशिष्ट दिवशीच हे लोक आपल्या सरकारी पोषाखात दिसतात. तरीही कोणीही विभाग प्रमुख त्यांच्या या वर्तनाबद्दल कधी आक्षेप घेताना दिसत नाही. एवढेच नाही तर ठिकठिकाणच्या पंचायत समित्यांमधील बीडीओंकडूनही याबद्दल कुरबूर केली जात नाही. यावरून जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख आणि पंचायत समित्यांमधील बीडीओ किती शिस्तप्रिय आहेत याची कल्पना येते.चपराशी की साहेब?जिल्हा परिषदेच्या काही विभागातील परिचर तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी वाटतच नाहीत. त्यांचा तोरा एखाद्या अधिकाऱ्याला लाजवेल असा असतो. त्यामुळे जिल्ह्यातून एखादा कर्मचारी किंवा कोणी व्यक्ती आपल्या कामासाठी जिल्हा परिषदेत आला तर परिचरालाच ‘साहेब’ म्हणून संबोधतो. आरोग्य विभागात ग्रामीण भागात कार्यरत काही डॉक्टरांनी तर हा अनुभव अनेक वेळा घेतला आहे. साहेबाच्या तोऱ्यात राहता यावे यासाठीच परिचर लोक सरकारी पोषाख घालणे टाळतात असे बोलले जाते.