शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने लाख खरेदी केंद्र उघडावे

By admin | Updated: May 23, 2015 01:47 IST

राज्याच्या पूर्व दिशेच्या टोकावर असलेल्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून लाख उत्पादन होत आहे.

उत्पादनात वाढ : लाख उत्पादक शेतकऱ्यांची मागणीगोंदिया : राज्याच्या पूर्व दिशेच्या टोकावर असलेल्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून लाख उत्पादन होत आहे. यात वाढ व्हावी म्हणून तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सतत प्रशिक्षण आयोजित केले होते. तसेच बियाणे वितरितही झाल्याने क्षेत्रात लाख उत्पादन वाढले. परंतु लाख खरेदी केंद्राअभावी शेतकरी अडचणीत येत आहेत.लाख उत्पादनाला योग्य मूल्य मिळावे यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न करून तत्कालीन यूपीए सरकारमध्ये लाखेस न्यूनतम समर्थन मूल्य घोषित करून दिले. हे समर्थन मूल्य देशातील नऊ राज्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी घोषित करण्यात आले आहे. सध्याच्या एनडीएस शासनानेसुद्धा लाखेचे महत्त्व समझून सदर न्यूनतम समर्थन मूल्य लागू ठेवले आहे. परंतु कोणत्याही प्रांतात अद्याप खरेदी केंद्र उघडण्यात आले नाही, हे मोठेच दुर्भाग्यपूर्ण आहे. महाराष्ट्रसुद्धा केंद्र शासनाद्वारे घोषित सदर नऊ राज्यांच्या सूचिमध्ये आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात व संपूर्ण देशात जेथे लाख उत्पादन होते, ही शेतकऱ्यांची आर्थिक पर्यायी व्यवस्था आहे. लाखेचे उत्पादन प्रामुख्याने आदिवासी तथा मागासलेल्या भागात होते. लाख उत्पादनासाठी अधिक पाण्याची गरज भासत नाही. तसेच लाख शेती सुगमतेने होते. बाजारात मागील वर्षी लाखेचा दर ३०० रूपये प्रति किलो होते. परंतु यावर्षी लाख ७० ते ७५ रूपये प्रति किलो दराने खुल्या बाजारात विक्री होत आहे. परंतु केंद्र शासनाने याचे समर्थन मूल्य पलास लाख २३० रूपये प्रति किलो तर कुसुमी लाख ३२० रूपये प्रति किलोच्या दराने घोषित केले आहे. महाराष्ट्र शासनाला याचे आदेशही देण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने लाख खरेदीसाठी आतापर्यंत केंद्र उघडले नाही. तसेच खरेदीची प्रक्रियासुद्धा सुरू केली नाही. त्यामुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी यांना मोठेच नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने त्वरित लाख खरेदी केंद्र उघडावे व शेतकऱ्यांना लाभ द्यावे, अशी मागणी किसान लाख कृषी उपज सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रनाथ चौबे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)