शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जमीन रुपांतरात तिरोडा एसडीओंकडून घोळ

By admin | Updated: February 24, 2017 01:49 IST

सध्या जिल्ह्यातील तिरोडा येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी देवरी येथे कार्यरत

विभागीय चौकशी होणार : नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारीगोंदिया : सध्या जिल्ह्यातील तिरोडा येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी देवरी येथे कार्यरत असताना शासकीय जमिनीचे नियमबाह्यपणे भोगवटदार वर्ग २ मधून भोगवटदार वर्ग १ या प्रकारात रूपांतर केले. याशिवाय इतरही काही मुद्यांवर त्यांच्या तक्रारी झाल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याची तयारी महसूल विभागाकडून केली जात आहे.तिरोडा येथे येण्याआधी सूर्यवंशी देवरी येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी राखीव जंगलाची काही गटातील काबिल कास्तकारीची जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित केली. हे करताना आर्थिक देवाणघेवाण करून नियमांना डावलल्याची तक्रार आमगावचे आमदार संजय पुराम यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची तपासणी केली असताना सूर्यवंशी यांनी केलेले जमिनीचे रूपांतर नियमांना डावलून केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तांना माहिती दिली. याशिवाय नियमबाह्यपणे केलेल्या जमीन रुपांतराची प्रकरणे रद्द करण्याचे निर्देश देवरीच्या विद्यमान उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. विशेष म्हणजे देवरी येथील पोलीस पाटील भरती प्रकरणातही सूर्यवंशी यांच्यावर आमदार पुराम यांनी ठपका ठेवला होता. एसडिओ सूर्यवंशी यांची ही कृती गंभीर असल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याची सूचना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र अद्याप विभागीय चौकशी सुरू झालेली नसल्याचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नागरिकांशी लोकप्रतिनिधींशी अरेरावीच्या वागणूक प्रकरणीही सूर्यवंशी यांची चौकशी सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल व वनविभागाच्या अवर सचिवांनी दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आमदारांशीही पंगाकार्यालयात आपली कैफियत घेऊन येणाऱ्या नागरिकांसोबत एसडिओ सुनील सूर्यवंशी यांची तुसडेपणाची वागणूक सर्वपरिचित आहे. मात्र लोकप्रतिनिधींसोबतही त्यांचे संबंध चांगले नाहीत. त्यामुळे आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार केली.देवरी येथे असताना आ.संजय पुराम यांच्याशी अरेरावी केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिरोड्याचे आ. विजय रहांगडाले यांच्याशीही त्यांनी पंगा घेतला. न.प. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू नसलेल्या ग्रामीण भागात त्यांची गाडी अडवून तपासणी करीत अधिकारीपणा गाजविला.