शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासन न्याय देणार?

By admin | Updated: January 19, 2017 01:27 IST

आदिवासी सहकारी संस्थेतून ४० हजार रु. कर्ज घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्याने त्रस्त शेतकऱ्याने ३ महिन्यापूर्वी विहीरीत

 देवरी : आदिवासी सहकारी संस्थेतून ४० हजार रु. कर्ज घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्याने त्रस्त शेतकऱ्याने ३ महिन्यापूर्वी विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली होती. परंतु शासनाकडून मृतक शेतकऱ्याच्या परिवाराला कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्याने मृतक शेतकऱ्याच्या परिवार आर्थिक संकटात सापडला असून परिवाराला शासन न्याय कधी देणार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांची आजारी पत्नी कलावती यांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील फुटाणा या गावातील शेतकरी मुरारी श्रावण राऊत (६६) यांनी २५ आॅक्टोबर २०१६ रोजी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली होती. मुरारी राऊत यांनी आदिवासी सहकारी संस्थेतून शेतीकरीता ४० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. दुसरीकडे मागील २० वर्षापासून पत्नी कलावती ब्लडप्रेशर व डायबीटीजमुळे बिमार होती. तिला नेहमी गोंदियाला उपचाराकरीता न्यायला खुप पैशाचा खर्च होत होता. शेतात पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने व घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी या चिंतेने ग्रस्त मुरारी श्रावण राऊत यांनी २३ आॅक्टोबरला घर सोडले. नातेवाईकांकडे शोध घेऊन ही पत्ता न लागल्याने घर कुटूंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशन चिचगडला तक्रार केली होती. २५ आॅक्टोबरला मुरारीचे प्रेत गावातीलच नुतन बन्सोड यांच्या शेतातील विहीरीत सापडले. मृतक शेतकऱ्याकडे सोसायटीचे कर्ज होते व कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा पुरावा प्रशासनीक अधिकारी यांचेकडे देण्यात आले.परंतु न्याय मिळत नसल्याने मृतकाच्या पत्नी कलावती यांनी आमदार व पालकमंत्र्याकडे निवेदन सादर करून शेतकरी आत्महत्या निधीतून शासनाकडून मदत व शेतीवर घेण्यात आलेले कर्ज माफ करण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला शासन तातडीने मदत करीत असते. परंतु या मृतक परिवाराच्या सदस्यांना अजून किती वेळ वाट पाहावी लागणार असा सवाल मृतकाची पत्नी कलावती यांनी केला आहे.