शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

निकृष्ट कामांना चांगुलपणाचा मुलामा

By admin | Updated: June 4, 2015 00:47 IST

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या साठवण बंधारे व तलावांच्या डागडुजीच्या ८८ कोटींच्या कामांमधील गैरप्रकाराची चौकशी तीन सदस्यीय समितीने केली.

गोंदिया : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या साठवण बंधारे व तलावांच्या डागडुजीच्या ८८ कोटींच्या कामांमधील गैरप्रकाराची चौकशी तीन सदस्यीय समितीने केली. नागपूर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशाने चंद्रपूर व नागपूर येथील अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली. मात्र या समितीने ‘आॅल ईज वेल’ दाखवत झालेल्या गैरप्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे.ज्या कामांबाबत बोलताना स्थानिक स्तरावरील अधिकारी आधी स्पष्टपणे काही सांगण्यास तयार नव्हते त्यांच्यात आता या समितीच्या दौऱ्यानंतर आत्मविश्वास बळावल्याचे दिसून येत आहे. सर्वकाही ठिकठाक झाल्याचा आव आणत ते कुठेच काही गैरप्रकार नसल्याचे सांगत असले तरी निकृष्ट कामांना चांगूलपणाचा मुलामा देण्यासाठी स्थानिक अधिकारी व कंत्राटदारांना बरीच कसरत करावी लागल्याची चर्चा आहे.जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, तिरोडा, अर्जुनी मोरगाव तालुक्यांमध्ये करण्यात आलेली ८८ कोटींची साठवण बंधाऱ्यांची कामे अधिकारी आणि कंत्राटदारांनी साटेलोटे करून पूर्ण केली. यातील अनेक कामे अंदाजपत्रक दराच्या १८ ते २० टक्के अधिक दराने वाटली असून झालेल्या कामांचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.वर्ष २०१३-१३ यादरम्यान गोंदियासह भंडारा जिल्ह्यात ही कोट्यवधीची जलसंधारणाची कामे वाटण्यात आली. गोंदियातील लघुसिंचन विभागाचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता (श्रेणी-१) यांच्या देखरेखीत झालेल्या निविदा प्रक्रिया व कामे वाटपाच्या प्रक्रियेपासून ही कामे वादग्रस्त ठरली आहेत. वाटप झालेली बहुतांश कामे अंदाजपत्रकापेक्षा जास्त किमतीत वाटण्यात आली. त्यातही कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असताना ती कामे चांगली झाल्याचे दाखवत झालेल्या कामांची बिले काढण्यात आली. पिंडकेपार १ बंधाऱ्याचे काम केवळ खड्डा खोदून बंद करण्यात आले तर पिंडकेपार २ बंधाऱ्याच्या कामात फक्त पायवा बांधला असताना १६ लाखांचे बिल चुकते करण्यात आले. वास्तविक या कामावरील प्रत्यक्ष खर्च ५ लाखांपेक्षाही कमी आहे. तरीही कामाची कोणतीही गुणवत्ता न तपासता या कामाचे बिल चुकते करण्यात आले. या बंधाऱ्याची उंची पुरेशी नसल्यामुळे नाल्यात पाण्याचा साठा होतच नाही.जोशीटोला येथील मामा तलाव, मानाकुही लघुपाटबंधारे तलाव आणि धनसुवा येथील कामांची निविदाच काढण्यात आली नाही. हे काम श्रमिक संस्था किंवा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला न देता आपल्या विशेष मर्जीतील ठेकेदाराच्या नावाने करारनामा करून काम देण्यात आले. २०१४-१५ मध्ये लघुपाटबंधारे विभागाच्या (जि.प.) उपविभाग सालेकसाद्वारा म.ग्रा.रो.ह.योमधून तिसऱ्यांदा डागडुजीचे काम करण्यात आले. वारंवार एकाच कामावर ज्या पद्धतीने पैसे लावले जात आहे त्यावरून हे काम किती निकृष्ट होत आहे याची कल्पना येते.याचप्रमाणे झाडुटोला, बेलाटी, गिरोला येथे साठवण बंधाऱ्याचे काम अन्य विभागांनी केल्यामुळे ही कामे रद्द करण्याची शिफारस सहायक अभियंता सोनिया जाधव यांनी केली होती. मात्र नंतर जबरदस्तीने कार्यकारी अभियंता व ठेकेदारांना गटवून ही कामे आवश्यकता नसताना दुसऱ्या ठिकाणी थातूरमातूर करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)