शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षणाच्या हक्का’त गोंदिया राज्यात अव्वल

By admin | Updated: March 30, 2017 01:06 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील .......

विद्यार्थ्यांना लॉटरीतून मोफत प्रवेश : १,२०,४२८ जागांसाठी १,४३,७५७ अर्ज, ४५,१९९ विद्यार्थ्यांना लाभ नरेश रहिले   गोंदिया बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद केली. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यातील ८ हजार २६४ शाळांमध्ये एक लाख २० हजार ४२८ जागा राखीव करण्यात आल्या. या जागांसाठी राज्यातील एक लाख ४३ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन वेळा झालेल्या सोडतीनंतर ४५ हजार १९९ विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी अ‍ॅडमीशन घेतले आहे. अ‍ॅडमीशन घेण्यात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पहिल्या व दुसऱ्या लॉटरीत या बालकांना प्रवेश मिळाला. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठविण्यात आले. जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे १ लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागले. गोंदिया जिल्ह्याच्या १३० शाळांमध्ये ११९७ जागांसाठी प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी १ हजार ३९८ अर्ज करण्यात आले होते. त्यातील ८०४ विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन प्रवेश मिळवून घेतला. जिल्ह्यातील ६७.१७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविल्यामुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकात आला. त्या पाठोपाठ धुळे ६४.३७ टक्के असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अकोला ६२.५५ टक्के, वर्धा ६१.०७ टक्के, अमरावती ५९.३८ टक्के, भंडारा ५८.३४ टक्के, यवतमाळ ५६.५२ टक्के, नागपूर ५६.१५ टक्के, अहमदनगर ४९.०७ टक्के, बीड ४५.६२ टक्के, पुणे ४५.५६ टक्के, उस्मानाबाद ४५.३० टक्के, नाशिक ४४.७० टक्के, नांदेड ४४.२९ टक्के, जळगाव ४३.५१ टक्के, गडचिरोली ४१.९६ टक्के, सातारा ४१.१२ टक्के, बुलढाणा ४०.५६ टक्के, वाशिम ४०.३१ टक्के, चंद्रपूर ३८.०६ टक्के, रायगड ३६.८१ टक्के, जालना ३५.९६ टक्के, लातूर ३३.२१ टक्के, औरंगाबाद ३१.३३ टक्के, परभणी २९.२५ टक्के, सोलापूर २७.४५ टक्के, हिंगोली २५.९८ टक्के, मुंबई २४.०२ टक्के, नंदुरबार २३.२३ टक्के, ठाणे २१.०० टक्के, सांगली २०.९९ टक्के, सिंधुदुर्ग २०.४० टक्के, रत्नागिरी १९.१७ टक्के, कोल्हापूर १६.०३ टक्के व पालघर ९.३५ टक्के बालकांनी प्रवेश घेतला आहे. २३ हजार ३२९ विद्यार्थ्यांना नो अ‍ॅडमिशन राज्यातील ८ हजार २६४ शाळांमध्ये एक लाख २० हजार ४२८ विद्यार्थ्यांना राखीव होत्या. आॅनलाईन पध्दतीने लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश द्याचे होते. ज्या विद्यार्थ्यांना जी शाळा मिळाली त्या शाळांत पालकांसोबत जाऊन विद्यार्थ्याचे नाव दाखल करायचे होते. राज्यातील एक लाख ४३ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. काहींनी प्रवेश घेतला तर काहींनी प्रवेश घेतला नाही. दोन वेळा झालेल्या सोडतीनंतर ४५ हजार १९९ विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी अ‍ॅडमीशन घेतले आहे. जागांपेक्षा अधिक २३ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने इतक्या संख्येतील विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश देता येणार नाही.