शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
3
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
5
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
6
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
7
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
8
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
9
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
10
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
11
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
12
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
13
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
14
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
15
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
16
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
17
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
18
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
19
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
20
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

गोंदियावासीयांना हवी हेल्मेटची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 01:18 IST

दिवसागणिक रस्त्यांवर दुचाकींची संख्या वाढत आहे. त्यातच प्रत्येकाला वेळ वाचविण्याची घाई असते. त्यामुळे दुचाकींच्या

नरेश रहिले ल्ल गोंदियादिवसागणिक रस्त्यांवर दुचाकींची संख्या वाढत आहे. त्यातच प्रत्येकाला वेळ वाचविण्याची घाई असते. त्यामुळे दुचाकींच्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. गोंदियासारख्या लहान शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सवय नसली तरी सरकारने सक्ती करण्याचे ठरविल्याने गोंदियावासीयांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने एका सर्वेक्षण प्रश्नावलीच्या माध्यमातून केला. त्यात ६६ टक्के लोकांनी हेल्मेटसक्तीच्या बाजूने आपले मत मांडले.शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू. त्यामुळेच मेंदूला नैसर्गिकरीत्या डोक्याच्या कडक आवरणाचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र अपघातात हे नैसर्गिक संरक्षण कुचकामी ठरते आणि डोक्याला मार लागल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. डोक्यावर हेल्मेट असल्यास मेंदूला गंभीर दुखापत होत नाही आणि अपघात झाला तरी प्राण वाचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच न्यायालयाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटचा वापर करण्याची सक्ती करावी असे निर्देश दिले. मोठ्या शहरांसोबत आणि लहान शहरातही ही सक्ती करण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. मात्र हेल्मेटचे महत्व न समजलेले किंवा नाहक त्रास वाटणारे लोक या सक्तीला विरोध दर्शवत असले तरी लोकमतच्या सर्व्हेक्षणात मात्र अनेक नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटल्याचे जाणवले. लोकमत १०० लोकांमध्ये सात प्रश्नांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. त्यात बहुतांश नागरिकांना हेल्मेटसक्तीच्या बाजुने सकारात्मक मतप्रदर्शन केले.काही लोक शहरात हेल्मेट वापरत नसले तरी दुचाकीने बाहेरगावी जाताना हेल्मेटचा वापर करतात. असे २० टक्के लोक आढळले. शासनाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती करणे योग्य आहे का? या प्रश्नाला ६६ टक्के लोकांनी होय तर ३४ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. ज्या ३४ टक्के नागरिकांनी हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविला त्यांच्या विरोधामागे अनेक कारणे दिसून आली. त्यामुळे सवय आणि महत्व कळल्यानंतर त्यांचाही विरोध दूर होऊ शकतो, असे दिसून आले.दुचाकी चालविणाऱ्यांसोबत मागे बसणाऱ्यांसाठीही हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे का? या प्रश्नाला ४७ टक्के लोकांनी होय तर ५३ टक्के लोकांनी नाही म्हणून उत्तर दिले. हेल्मेटची सक्ती करणे हा दुचाकीस्वारांसाठी नाहक भूर्दंड वाटतो का, या प्रश्नाला होय म्हणणारे ३९ टक्के तर नाही म्हणणारे ६१ टक्के लोक आढळले. यावरून हेल्मेट खरेदीसाठी खर्च करावे लागणारे पैसे ३९ लोकांना भुर्दंड वाटत असल्याचे दिसून आले.हेल्मेट नेहमी जवळ बाळगणे त्रासदायक ठरणार का? या प्रश्नाला तर ७८ टक्के लोकांनी होय म्हटले. त्यांचे हे उत्तर बऱ्याच अंशी बरोबरही आहे. कुठेही जाताना सतत हेल्मेट सोबत बाळगावे लागणार हे थोडे त्रासदायक आहे. पण सवय झाल्यानंतर ती अडचण जाणवणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. हेल्मेटचा त्रास होतो म्हणाऱ्यांचे डोळे नंतरच्या प्रश्नाने मात्र उघडले. हेल्मेटच्या त्रासापेक्षा स्वत:चे संरक्षण महत्वाचे वाटत नाही का? असा तो प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर ेदेताना ८० टक्के लोकांनी होय असे उत्तर देऊन त्रासपेक्षा संरक्षण महत्वाचे वाटते हे कबूल केले. सातव्या प्रश्नात हेल्मेटची सक्ती असावी तर का असावी आणि नसावी तर का नसावी यावर थोडक्यात नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले. त्यात अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.१२२ अपघातात १३२ जणांचा मृत्यू४दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करुन वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगितले जातात. तरी देखील हलगर्जीपणे वाहन चालवून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. सन २०१५ च्या वर्षभरात २७७ अपघात घडले असून १२२ प्राणांतिक अपघातात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१७ लोक गंभीर जखमी झाले. किरकोळ जखमीम्ांंध्ये १०६ जण आहेत.हेल्मेट पडले धूळ खात ४आघाडी सरकाच्या काळात हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती. त्यावेळी कारवाईच्या धास्तीने अनेकांनी हेल्मेट खरेदी केले. परंतु नंतर या हेल्मेटसक्तीने राजकीय रंग घेतल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले. लोकांनी त्यावेळी कारवाईच्या दहशतीपोटी विकत घेतलेले हेल्मेट धूळ खात पडले आहेत.