शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

गोंदियाला मिळणार कारागृह

By admin | Updated: February 13, 2016 01:12 IST

जिल्हा निर्मितीला १७ वर्षे होत असतानाही गोंदियासारख्या जिल्ह्यात तुरूंग (कारागृह) नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते.

कारंजात जागेची निवड : १७ वर्षांपासूनची प्रतीक्षा, आरोपींना भंडाऱ्याला नेण्याचा त्रास वाचणारनरेश रहिले गोंदियाजिल्हा निर्मितीला १७ वर्षे होत असतानाही गोंदियासारख्या जिल्ह्यात तुरूंग (कारागृह) नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या पैशाचा आणि वेळेचाही अपव्यय होत होता. अखेर अनेक वर्षाच्या मागणीनंतर आता गोंदियात कारागृह तयार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यापेक्षा गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे. महिन्याकाठी १२५ ते १५० च्या घरात आरोपींना गोंदियातून भंडारा येथील कारागृहात पाठविले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. त्यातच वाहन व्यवस्था करावी लागते. त्यासाठी लागणारे इंधन ही सर्व परिस्थिती पाहता गोंदियात कारागृह करणे गरजेचे झाले आहे. गोंदियातील आरोपीना भंडारा येथे नेत असताना कुणी आरोपी पसार होऊ नये किंवा त्याने वाहनातून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. आरोपी पळून गेल्यामुळे अनेक पोलीस शिपाई निलंबितही झाले आहेत. हा सर्व त्रास दूर करण्यासाठी गोंदियात कारागृह तयार करणे गरजेचे होते. शासनाने सन २०११-१२ मध्ये गोंदियात ‘वर्ग एक’चे कारागृह तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यानंतर जागा पाहण्याच्या हालचाली भंडारा जिल्हा कारागृह कार्यालयाकडून झाल्या. परंतु अधीक्षक बदलून गेले व वर्ग एकचे कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव तसाच पडून राहीला. भंडारा जिल्हा कारागृह अक्षीक्षक म्हणून अनुपकुमार कुंभरे नोव्हेंबरमध्ये रूजू झाले. त्यानंतर मंत्रालयातील नगररचना कार्यालयाने गोंदियात वर्ग दोनचे कारागृह तयार करण्यास मंजूरी देत त्यासाठी जागा पाहण्याचा आदेश काढला. त्यानुसार डिसेंबर ४ व ५ तारखेला भंडारा कारागृह अधीक्षकांनी जागेची पाहणी केली. गोंदियाच्या पोलीस मुख्यालयामागील जागेत कारागृह तयार करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. त्या संबंधात अंदाजपत्रक आराखडा तयार करून त्याला खर्च किती येणार याचा अहवाल शासनाने मागितला आहे. तो आराखडा तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. तो आराखडा शासनाकडे गेल्यावर त्यासाठी निधी मिळणार आहे. ३०० आरोपींची क्षमतागोंदिया जिल्ह्यातील आरोपींना या कारागृह ठेवण्यात येणार आहे. या तरूंगात २५० ते ३०० कैदी ठेवण्याची क्षमता राहणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आरोपींना आता भंडाराच्या कारागृह नेण्याचा पोलिसांचा त्रास वाचणार आहे. गोंदियात वर्ग एकचे कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र आता याच कारागृहाला वर्ग दोनचे कारागृह करण्यात यावे अशा सूचना शासन स्तरावरून करण्यात आल्या. त्यामुळे यामागचे कारण नेमके काय, हे मात्र गुलदस्त्यात आहे.