शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कवलेवाडा प्रकरणाच्या निषेधार्थ आज गोंदिया बंद

By admin | Updated: May 23, 2014 00:00 IST

गोरेगाव तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथे दलित इसमाला जाळल्याप्रकरणी आंबेडकरवादी कृती समितीने २३ मे रोजी गोंदिया बंदचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या निषेधार्थ

 गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथे दलित इसमाला जाळल्याप्रकरणी आंबेडकरवादी कृती समितीने २३ मे रोजी गोंदिया बंदचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या निषेधार्थ समितीच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. कवलेवाडा येथील दलित इसम संजय खोब्रागडे यास गावातीलच काहींनी जाळून मारण्याचा प्रयत्न केला. सध्या संजय नागपूर येथे मृत्यूशी झूंज देत आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी गावातीलच सहा जणांना अटक केली व त्यांना न्यायालयाने २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. हा सर्व प्रकार सुरू असतानाच मात्र प्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नी व तिच्या प्रियकराने त्याला जाळून मारण्याचा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. तसेच त्या दोघांना अटक केली आहे. मात्र पोलीस या प्रकरणाला चुकीचा अर्थ लाऊन सादर करीत असून गावातील त्या सहा जणांना वाचविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे आंबेडकरवादी कृती समितीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यावर समितीच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ येथील तहसिल कार्यालयासमोर बुधवारपासून (दि.२१) धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गुरूवारीही आंबेडकर वादी कृती समितीच्या कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन सुरूच होते. एवढेच नव्हे तर २३ मे रोजी गोंदिया बंदचेही आवाहन करण्यात आले आहे. धरणे आंदोलनात राजकुमार बोंबार्डे, सतीश बंसोड, राजू राहुलकर, मामा बंसोड, विनोद मेश्राम, शुद्धोधन शहारे, रतन वासनिक, वसंत गणवीर, अशोक मेश्राम, यशपाल डोंगर व अन्य कार्यकर्ता सहभागी झाले. (शहर प्रतिनिधी)