शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ‘टॉप थ्री’ मध्ये गोंदिया

By admin | Updated: May 9, 2016 01:45 IST

जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण जनतेच्या आरोग्यविषयक सर्व समस्या सुटाव्यात यासाठी गोंदियाच्या आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत.

जीवनदायीतून रुग्णांवर १० कोटी खर्चनरेश रहिले गोंदियाजिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण जनतेच्या आरोग्यविषयक सर्व समस्या सुटाव्यात यासाठी गोंदियाच्या आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्या अखत्यारित येत असलेल्या १० ग्रामीण रूग्णालयांसह केटीएस, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय व तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवांबद्दल जिल्हा महाराष्ट्रात टॉप थ्री मध्ये असल्याचे स्वत: आरोग्य सेवा, मंत्रालयाचे प्राधन सचिवांनी हिट अ‍ॅक्शन कार्यक्रमात जाहीर केले.आरोग्य सेवेचे सबलीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धकाते यांनी जिल्ह्यात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा गोवा येथे आयोजित जागतिक आरोग्य परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मांडला. आरोग्य सेवेत अडचणी व त्यावर उपाय यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कायाकल्पमध्ये गोंदिया राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्षय रूग्णांसाठी वरदान ठरणारी सीबीनेट मशीन बसविण्यात आली. आपातकालीन सेवेचा ६०२१ रूग्णांना लाभ देण्यात आला. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात लेप्रोस्कोपी मशीन सेवा सुरू करण्यात आली. २० विद्यार्थिनींसाठी ए.एन.एम. नर्सिंग स्कूल तयार करण्यात आले. आधुनिक यंत्रासह हायटेक आयसीयू तयार करण्यात आले. जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना अशा सर्वच योजनांचा लाभ रूग्णांना देण्यात रूग्णालय यशस्वी राहीले आहे. १० हजार ४८९ लोकांची नोंदणी२१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेत अल्प उत्पन्न असलेल्या पिवळा व शेंदरी कार्डधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. आजपावेतो १० हजार ४८९ लोकांची यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. ४ हजार ६४४ लोकांना या सेवेचा लाभ देण्यात आला आहे. त्यांच्यावर ९ कोटी ९९ लाख ८६ हजार २६५ रूपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहे. डायलिसीसमध्ये गोंदिया मॉडेलकेटीएस येथे सन २०१३-१४ मध्ये डायलिसीस केंद्र सुरू करण्यात आले. त्यात आतापर्यंत ३ हजार ९६१ रूग्णांना या सेवेचा लाभ देण्यात आला. या डायलिसीस युनिट व आयसीयुला प्रल्प संचालक व आरोग्य संचालकांनी महाराष्ट्रात अव्वल असल्याचे घोषित केले व गोंदियाला मॉडेल म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मागणीगोंदिया जिल्हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अतिदुर्गम आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड व मुंबई-हावडा रेल्वे मर्गावर असल्यामुळे येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्याची मागणी डॉ. धकाते यांनी केंद्रीय पथकाकडे केली आहे. हे रूग्णालय स्थापन केल्यास अँॅजीयोग्राफी, अँजीयोप्लास्टी, कार्डीओथोरॅसीक सर्जरी, किडणी ट्रान्सप्लान्ट, कर्करोग, न्यूरोसर्जरी, अतिदक्षता विभागाची सेवा मिळेल. त्यामुळे येथील रूग्ण नागपूरला जाणार नाहीत.