शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया न.प. विषय समिती सभापतींची आज निवड

By admin | Updated: March 11, 2015 01:19 IST

नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बुधवारी (दि.११) होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सभापतींचे पद काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

गोंदिया : नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बुधवारी (दि.११) होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सभापतींचे पद काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र नगरपरिषदेतील संख्याबळ बघता सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी हे काम कठीण दिसून येत आहे. असे असले तरीही राजकारणात काहीही अशक्य नसल्याने निवडणुकीत काय घडणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषद सभापतींचा कार्यकाळ ११ मार्च रोजी पूर्ण होत असल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगी नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ६३ (२)(ब) नुसार ही निवडणूक घेतली जात आहे. नगरपरिषदेत आज सत्ता भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीची असली तरिही सभापती कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. यात बांधकाम समिती सभापती राष्ट्रवादीचे खालीद पठाण, शिक्षण समिती सभापती कॉंग्रेसच्या ममता बंसोड, महिला व बाल कल्याण समिती सभापती कॉंग्रेसच्या अनिता बैरीसाल, पाणी पुरवठा समिती सभापती राष्ट्रवादीच्या कोमल आहुजा तर स्वच्छता व आरोग्य समिती सभापती नगपरिषद उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी आहे. शिवाय नियोजन व विकास समितीचीही निवड केली जाईल. त्यातही सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे असलेले बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभाग हे आता कॉंग्रेसकडे तर कॉंग्रेसकडे असलेले शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग आणि नियोजन व विकास समिती राष्ट्रवादीकडे येणार आहे. त्यामुळे या पदासांठी या पक्षांनीही सेटींग करण्यास सुरूवात केली आहे. वास्तवीक मात्र, नगरपरिषदेतील राजकीय पक्षांचे संख्याबळ बघता भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे संख्याबळ कमी असून त्यामुळेच त्यांना सभापती पद काबीज करणे कठिण दिसून येत आहे. मात्र गोंदिया नगरपरिषदेत फोडाफोडीचे राजकारण नवे नसल्याने बुधवारच्या (दि.११) निवडणुकीत काय चित्र तयार होणार हे सांगणे कठीण आहे. त्यामुळेच सभापती पदाच्या या निवडणुकीला घेऊन राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तर या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)