शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया एफएमची क्षमता वाढणार

By admin | Updated: June 4, 2015 00:52 IST

आपले मनपसंत गाणे ऐकण्याची हौस भागविणारे विविध एफएम स्टेशन आजघडीला तयार झाले आहेत. प्रत्येकच शहराचे त्यांचे एफएम स्टेशन तयार होत असून त्यानुसार ...

एक किलोवॅट होणार : कव्हरेज क्षेत्रातही होणार वाढ गोंदिया : आपले मनपसंत गाणे ऐकण्याची हौस भागविणारे विविध एफएम स्टेशन आजघडीला तयार झाले आहेत. प्रत्येकच शहराचे त्यांचे एफएम स्टेशन तयार होत असून त्यानुसार गोंदिया एफएम सन २०१३ पासून सुरू करण्यात आले आहे. सध्या १०० वॉट क्षमता असलेल्या या ‘एफएम’ची आता क्षमता वाढवून एक किलोवॅट केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्थातच एफएमच्या कव्हरेज क्षेत्रात वाढ होणार असून दूरवरच्या संगीत शौकिनांना त्याचा लाभ होणार आहे. येथील आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून १५ फेब्रुवारी २०१३ पासून गोंदिया एफएम केंद्र सुरू करण्यात आले आहे. एफएम म्हटले की, आपल्या पसंतीची गाणे सांगितल्यास संबंधीत स्टेशनकडून तुमच्या फरमाईशचे गाणे ऐकविले जाते. यासाठी ठरवून दिलेल्या क्रमांकाचे बँड सेट करून या सुविधेचा लाभ घेता येतो. आता तर मोबाईलच्या माध्यमातूनही युवाच काय वयोवृद्धही आपली आवड सांगून मनपसंत गाणे ऐकताना दिसत आहेत. मोठ्या शहरांतील एफएमची ही सुविधा गोंदियाच्या स्टेशनकडून सुरू करण्यात आली असून गोंदियावासीही एफएमचा लाभ घेत आहेत. मात्र आजघडीला १०० वॅट क्षमतेवर गोंदिया एफएम चालविले जात आहे. त्यामुळे याचे कव्हरेज क्षेत्र सुमारे सहा ते सात किमी अंतराचे आहे. या रेंजमध्ये असलेल्यांनाच एफएमवर गाणे ऐकता येत आहेत. कमी क्षमता असल्याने नागरिकांना यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे गोंदिया एफएमची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत गोंदिया एफएमची क्षमता आता १ किलोवॅट करण्यात येणार आहे. ही क्षमता केव्हा वाढणार याचा कालावधी सांगता येणार नसल्याचे वरिष्ठ तंत्रज्ञ जी.झेड. कनोजे यांनी सांगीतले. मात्र ही क्षमता वाढविल्यानंतर कव्हरेज क्षेत्रात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)