शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया व अर्जुनीत साडेपाच लाखांची चोरी

By admin | Updated: May 22, 2014 01:13 IST

अर्जुनी/मोरगाव व गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत अशा दोन ठिकाणी झालेल्या चोरींच्या घटनेत ५ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.

गोंदिया : अर्जुनी/मोरगाव व गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत अशा दोन ठिकाणी झालेल्या चोरींच्या घटनेत ५ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. यासंदर्भात संबंधित पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या गजानन कॉलनीतील फ्लॅट नंबर ६ येथील हरिश्‍चंद्र परसराम बारबुद्धे यांच्या घराच्या समोरील दाराचा कोंडा तोडून बेडरुममधील कपाटात ठेवलेल्या बॅगेतील दोन लाख ४८ हजार रुपये रोख व दोन लाख १0 हजारांचे दागिने असा चार लाख ६0 हजार ४00 रुपयांचा माल पळविण्यात आला. यात साडेपाच तोळे वजनाचे दोन मंगळसूत्र, एक तोळा वजनाचे दोन सोन्याचे कानातील रिंग, ५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे डोरले व एक तोळा वजनाची सोन्याची साखळी, तसेच चार ग्रॅम वजनाचे एक जोडी कानातील टॉप्स, १६ नग स्टील नळ व दोन नग शॉवर व दोन हजार ४00 रुपये रोख असा एकूण ४ लाख ६0 हजार ४00 रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी पळविला.

सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या निमगाव येथील आहे. उद्धव अरविंद खोब्रागडे (७0) यांच्या घरून अज्ञात चोरट्यांनी ९३ हजारांचे दागिने पळविले. ते कुटुंबासह बाहेरगावी गेले असता ४ ते २0 मे दरम्यान त्यांच्या घरी सहा ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी, १0 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, तीन ग्रॅम वजनाचे पदक व चार ग्रॅम वजनाच्या बिर्‍या असा ९३ हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी पळविला. सदर घटनेसंदर्भात अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)