शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा ऑनलाइन करण्यास मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST

गोंदिया : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर रबी हंगामातील धान विक्री करण्यासाठी ऑनलाइन सातबारा सादर करण्याची अंतिम तारीख ३० ...

गोंदिया : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर रबी हंगामातील धान विक्री करण्यासाठी ऑनलाइन सातबारा सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल होती. परंतु कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तलाठी आणि शेतकरी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने सातबारा ऑनलाइन होऊ शकला नाही. परिणामी त्यांच्या रब्बीतील धानाची ऑनलाइन सातबारावर नोंद झाली नाही. त्यामुळे सातबारावर ऑनलाइन नोंदणी करण्याची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांच्याकडे मुंबई येथे भेटीदरम्यान केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्दिष्ट ३० लाख क्विंटल निर्धारित केले आहे. परंतु सद्य:परिस्थितीत जिल्ह्यात एकूण २ लाख ५० हजार क्विंटल क्षमतेचे गुदाम उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान खरेदी होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. अशी शंका आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न आणि नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांच्यापुढे व्यक्त केली. त्यावर विलास पाटील यांनी गरज पडल्यास खासगी गुदामे भाडेतत्त्वावर घेऊन शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येईल, असे आश्वासन आमदार अग्रवाल यांना दिले. धान खरेदीसंबंधी विविध समस्या शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून उद्‌भवत आहेत. सर्व गुदामे पूर्णपणे भरले असल्याने धान ठेवण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. खरीप हंगामामधील धान खरेदीसुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. याबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला गेला. संपूर्ण जिल्ह्यात एक लाख क्विंटल धान खरेदी करण्याची क्षमता आहे. परंतु अद्याप खरीप हंगामातील धान उघड्यावर पडले असून, पावसाळा सुरू होण्यास मात्र ३० दिवस उरलेले आहेत. यामुळे उघड्यावर ठेवण्यात आलेले धान पावसामुळे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

......

अन्न व नागरी पुरवठा सचिव शुक्रवारी गोंदियाच्या दौऱ्यावर

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कित्येक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात आता धान खरेदी न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न आणि नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांना दिला आहे. त्यावर अन्न व नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांनी समस्यांचा आढावा घेण्यासाठी गोंदिया येथे येणार असल्याचे सांगितले.