शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी देऊन दिलासा द्या

By admin | Updated: June 26, 2016 01:34 IST

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सरकार व नाबार्डची मंजुरी येण्यास उशिर झाला तरी बँकेच्या निधीतून शेतकऱ्यांना ६५ कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले.

राजेंद्र जैन : जिल्हा बँकेने स्वनिधीतून वाटले ६५ कोटीगोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सरकार व नाबार्डची मंजुरी येण्यास उशिर झाला तरी बँकेच्या निधीतून शेतकऱ्यांना ६५ कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले. दोन वर्षापासून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्जवसुली करणे अवघड होत असून त्यांच्याकडील कर्ज सरकारने माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आ.राजेंद्र जैन यांनी केली आहे.यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आ.जैन यांनी सांगितले की, जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांना कर्ज वाटपात नेहमीच आघाडीवर राहते. जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेकडून कर्जासाठी जी लिमिट मिळते त्यासाठी गेल्या एक महिन्यापासून जिल्हा बँक प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहकार विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही आतापर्यंत जिल्हा बँकेची लिमिट मंजूर झाली नाही. गेल्या १० वर्षात पहिल्यांदा असे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण केल्या जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा बँकेने १८ जूनच्या संचालक मंडळाच्या सभेत ९.७५ टक्के व्याज दराने राज्य सहकारी बँकेकडून लिमिट प्रस्ताव मंजूर करवून घेऊन आता कर्ज वाटप नव्या जोमाने सुरू केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला. वसुली न झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण त्यातही शेतकऱ्यांचे हित जोपासत असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)