शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मदत मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: May 23, 2016 01:48 IST

शनिवारच्या चक्रीवादळाच्या तांडवाने घरांसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. बनाथर गावात चक्रीवादळाच्या तीव्रतेत दिलीप बर्वे हा व्यक्ती ३०० मीटर अंतरावर फेकला गेला.

गोंदिया : शनिवारच्या चक्रीवादळाच्या तांडवाने घरांसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. बनाथर गावात चक्रीवादळाच्या तीव्रतेत दिलीप बर्वे हा व्यक्ती ३०० मीटर अंतरावर फेकला गेला. तसेच बडगाव येथील १० वर्षीय चिमुकली २०० मीटर अंतरावर फेकली गेली. या घटनांमुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेचा अंदाज बांधणे अवाक्याबाहेर असल्याचे प्रत्यक्ष केलेल्या पाहणीतून दिसून आले. मात्र संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्तांना भेटीदरम्यान धीर देताना दिली. जिल्ह्यात शनिवारी चक्रीवादळाने चांगलाच धुमाकूळ घातला. गोंदिया तालुक्यासह जवळपास सर्वच तालुक्यात अतोनात नुकसान झाले. गोंदिया तालुक्यातील बनाथर, शिरपूर, रावणवाडी, खातिया, बिर्सी, कोचेवाही, सतोना, बडगाव, परसवाडा, कामठा, बिरसोला, काटी, जिरूटोला यासह जवळपास तालुक्यातील ५० टक्के गावे बाधित झाली. प्रत्येक गावातील ५० हून अधिक घरांची छते उडाली व शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील हजारो कुटुंबे बेघर झाले. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची दखल माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी गावोगावी जावून नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेवून पाहणी केली. यावेळी त्यांनी संकटात सापडलेल्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून जिल्ह्यात व गोंदिया तालुक्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा, अशी विनंती केली. त्यानुसार रविवारी २२ मे रोजी उपविभागीय अधिकारी केएनके राव हे महसूल अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. या गंभीर संकटातून शेतकरी व नागरिकांनी घाबरू नये, शासनाकडून कोणत्याही परिस्थितीत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आपण मागेपुढे पाहणार नाही, अशी ग्वाही विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांवा देवून धीर दिला.