शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी सज्ज राहा

By admin | Updated: June 16, 2016 02:21 IST

आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसिर्गक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

राजकुमार बडोले : पर्यावरण संतुलनासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी पुढाकार घ्यावागोंदिया : आज पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे अनेक नैसिर्गक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. येत्या १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्र मात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १३ जून रोजी आयोजित सभेत जिल्ह्यात १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेताना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती छाया दसरे, सडक-अर्जुनी पंचायत समितीचे सभापती कविता रंगारी, अर्जुनी-मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर, गोरेगाव पं.स. सभापती दिलीप चौधरी, सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म हा अत्यंत महत्वाचा कार्यक्र म आहे. जुन्या योजनेतून केलेली वृक्ष लागवड व १ जुलैला करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीतील रोपे जगविणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारी रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्र म हा नियोजनबध्द पध्दती राबवावा, असेही त्यांनी सांगितले.डॉ. सूर्यवंशी म्हणाले, १ जुलैला होणारा २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र म जिल्ह्यात लोकचळवळ म्हणून राबविण्यात येणार आहे. एक घर एक वृक्ष या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, बचत गटांच्या महिला व विद्यार्थ्यांना या वृक्ष लागवडीत सहभागी करण्यात येणार आहे. हा कार्यक्र म प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध यंत्रणांच्या आतापर्यंत सहा बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.वृक्ष लागवड कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळावा यासाठी आकाशवाणी, स्थानिक केबल नेटवर्कवरून मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ज्या ठिकाणी रोपे लावण्यात येणार आहेत त्या ठिकाणी रोपांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ९ लाख ७२ हजार ३४३ रोपे जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत लावण्यात येणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व यंत्रणांना या कार्यक्र मात प्रभावीपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पंचायत समित्यांचा परिसर, अंगणवाडी पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत यासह अन्य कार्यालयांच्या परिसरात वृक्ष लागवड करणार येणार असून रोपे जगविण्याची जबाबदारीही संबंधितांवर निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.उपसंचालक बडगे माहिती देताना म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्र म सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सोबत घेऊन प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण २४ लाख ८० हजार, वनविभाग १७ लाख ०९ हजार २३०, वनविकास महामंडळ ङ्क्त४ लाख ४० हजार, कृषी विभाग ३१ हजार ७५५ व खासगी १ लाख ६९ हजार ७८५ या विभागांनी एकूण २५ लाख ९८ हजार ७७० विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती केली आहे.सदर कार्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)