शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत निवडणुकीकरिता सज्ज व्हा

By admin | Updated: September 29, 2015 03:19 IST

नव्याने तयार झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार असून या मिनी सार्वत्रिक निवडणुका आहेत.

गोंदिया : नव्याने तयार झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार असून या मिनी सार्वत्रिक निवडणुका आहेत. यातील सर्वाधिक निवडणुका विदर्भात आहेत. जिल्ह्यातील सर्व नगर पंचायतींवर १०० टक्के भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापित होणे आवश्यक आहे. याकरिता कार्यकर्त्यांनी जोेमाने सर्व ताकदनिशी कामाला लागून विजय संपादन करायचा आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.२५) आयोजित महासंपर्क आढावा बैठकीत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. यावेळी प्रामुख्याने खासदार नाना पटोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, माजी आमदार केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद सभापती देवराम वडगाये, छाया दसरे, मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष झामसिंग येरणे, चंद्रपूरचे संघटनमंत्री भोजराज डुबे, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, माजी जिल्हा परिषद सभापती सविता पुराम, उमाकांत ढेंगे, संजय कुळकर्णी, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कोठेकर यांनी, महासंपर्क अभियानाचे काम ५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करून जिल्हाध्यक्षांकडे सक्रिय सदस्यांची यादी जमा करावी. प्रत्येक बुथवर एक सक्रिय सदस्य तसेच प्रत्येक मंडळामध्ये कमीत कमी शंभर सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. या सक्रिय सदस्यांमध्ये महिला सदस्यांचाही समावेश असावा. ६ आॅक्टोबर रोजी जिल्हाध्यक्षांनी बैठक घेऊन तालुकास्तरावर सक्रिय सदस्यांचे एक दिवसीय अभ्यास वर्गाचे नियोजन करावयाचे आहे. या दृष्टिकोनातून प्रत्येक बुथवर गतीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. बैठकीत प्रत्येक तालुक्याचा महासंपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. तसेच नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. संचालन जिल्हा महामंत्री अंजनकर यांनी केले. बैठकीला ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, तालुकाध्यक्ष चत्रुर्भूज बिसेन, श्याम शिवणकर, रघुनाथ लांजेवार, लक्ष्मण भगत, नामदेव कापगते, जिल्हा परिषद सदस्य अल्ताफ शेख, प्रवीण दहिकर, राजेंद्र बडोले, डी.के.झरारिया, अमित झा, सुनील केलनका, महेंद्र बघेले, दामोदर नेवारे, छत्रपाल तुरकर, सुरेश कोसरकर, नितीन कटरे, घनश्याम अग्रवाल, पंकज सोनवाने यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील अध्यक्ष, महामंत्री व पदाधिकारी उपस्थित होेते. (शहर प्रतिनिधी)