शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

गॅस गळतीने अग्नितांडव

By admin | Updated: May 13, 2015 01:31 IST

टायर पंक्चरच्या दुकानात स्वयंपाक बनवीत असताना गॅसच्या गळतीमुळे दुकानाला भीषण आग लागली.

देवरी : टायर पंक्चरच्या दुकानात स्वयंपाक बनवीत असताना गॅसच्या गळतीमुळे दुकानाला भीषण आग लागली. त्यात सदर टायर पंक्चरचे दुकान पूर्णत: जळून राख झाले. दुकानातील लाखो रूपयांचे सामान-साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवार (दि.१२) सकाळी ८ वाजताच्या सुमारास देवरी येथे घडली. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला लागून असलेले रहमत टायर वर्क्स या दुकानातच अलाऊद्दीन जमुराती अंसारी व त्यांचा मुलगा शब्बीर अंसारी बऱ्याच वर्षांपासून राहत होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता शब्बीरने स्वयंपाक बनविण्याकरिता स्टोव्ह पेटविला होता. मात्र बाजूला ठेवलेल्या सिलेंडरमधून गॅस गळती होत असल्याने सिलेंडर व टायरला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की दुकानातील सर्व लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले. सिलेंडर फाटल्यामुळे आग अधिकच भडकली होती.दरम्यान दुकानातील साहित्य वाचविण्याच्या प्रयत्नात शेजारचा दुकानदार महेशकुमार अग्रवाल आगीत होरपळून जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली व आगीला आटोक्यात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. बाजूलाच लागून असलेल्या जय टायर्स येथील शेकडो टायर देवरीवासीयांच्या प्रयत्नामुळे वाचले. टँकरने पाणी बोलावून आग विझविण्यात आली. गोंदियावरून अग्निशामकाचे वाहन दोन तासानंतर पोहचले. तोपर्यंत गावकऱ्यांनी आगीला आटोक्यात आणण्यात यश मिळविले होते. मात्र या घटनेमुळे देवरीवासीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले. (प्रतिनिधी)देवरीवासीयांच्या साहसामुळे जीवित हानी टळली टायर पंचरच्या दुकानात लागलेल्या भीषण आगीला जर देवरीवासीयांनी वेळेवर आटोक्यात आणले नसते तर त्याच चाळीमध्ये असलेले टायरचे दुसरे दुकान, आॅईलचे दुकान व कापडाचे दुकान हेसुद्धा आगीत स्वाहा झाले असते, एवढ भीषण हे अग्नितांडव होते. घटनास्थळावरून २०० मीटर अंतरावरच पेट्रोल पंप होते. नेहमीप्रमाणे गावकऱ्यांनी आग विझविण्याकरिता जे साहस दाखविले, त्यामुळे होणारी मोठी जीवित हानी टळली, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. रोख ४५ हजार रूपये अग्नीच्या विळख्यातअल्लाऊद्दिन अंसारी यांच्या रहमत टायर वर्क्सच्या टायर पंक्चर दुकानात गोंदियाच्या मातीच्या तेलाचे व्यापारी मुन्नासेठ यांचे १५ हजार रूपये ठेवले होते. तसेच त्यांचे स्वत:चे ३० हजार रूपये ठेवले होते. हे रोख ४५ हजार रूपये आगीच्या विळख्यात स्वाहा झाले. त्यामुळे सामान-साहित्यासह रोख रकमेचीही मोठीच हानी झाली.तीन जण गंभीर जखमीया गॅस गळतीच्या अग्नितांडवामध्ये रहमत टायर वर्क्सचे अलाऊद्दीन जमुराती अंसारी काही प्रमाणात भाजले गेले. तर त्यांचा मुलगा शब्बीर अंसारी यांचा हात भाजला. तसेच घरमालकाचा लहान भाऊ महेशकुमार रामेश्वर अग्रवाल हे गंभीररीत्या आगीत होरपळून जखमी झाले. त्यांना त्वरित देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्याप कुणाचीही जीवित हानी न झाल्याने देवरीवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.