शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

२९,२४६ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन

By admin | Updated: May 19, 2017 01:31 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत जिल्ह्यात १६ मे २०१७ पर्यंत ४७ हजार २२२ अर्ज गॅस कनेक्शन मिळण्यासाठी प्राप्त झाले.

४०,८०२ लाभार्थी पात्र : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत जिल्ह्यात १६ मे २०१७ पर्यंत ४७ हजार २२२ अर्ज गॅस कनेक्शन मिळण्यासाठी प्राप्त झाले. यापैकी ४० हजार ८०२ अर्ज गॅस कनेक्शन मिळण्यास पात्र आहेत. तर २९ हजार २४६ गॅस कनेक्शन लाभार्थ्यांना लावून देण्यात आले आहेत. तसेच नवीन नोंदणी सुरू असून उर्वरित ११ हजार ५५६ कनेक्शन ३० जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के. सवई यांनी दिले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक एजन्सी, सर्व गॅस कंपन्यांचे विक्री अधिकारी व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सवई यांनी केले आहे. मंगळवारी १६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के. सवई यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या गॅस कनेक्शनबाबत सर्व गॅस कंपन्यांचे विक्री अधिकारी व जिल्ह्यातील गॅस वितरक एजन्सी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यात एचपीसीचे विभागीय नोडल अधिकारी आदित्य टाक, सहायक पुरवठा अधिकारी सी.आर. भंडारी, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक एजन्सीधारक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने खासदार नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे १५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत योजनेच्या प्रभावकारी व परिणामात्मक अंमलबजावणीच्या दृष्टीने संबंधितांना कडक निर्देश दिले आहे. त्या निमित्तानेच सदर सभा घेण्यात आली. एचपीसीचे विभागीय नोडल अधिकारी आदित्य टाक यांनी उर्वरित कनेक्शची कार्यवाही ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही तथा त्यांचे नाव सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण यादीत नाही, त्यांनी स्वतंत्ररित्या संबंधित गॅस एजन्सीकडे अर्ज सादर करावा, असे त्यांनी सांगितले. योजनेचा लाभ कसा व कोणाला? प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलेचे नाव यादीत आहे व ज्यांच्या नावे गॅस कनेक्शन नाही, अशा पात्र महिलांना गॅस जोडणी १०० रूपयांचे नोंदणी शुल्क भरून घेता येते. तसेच उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याची सुविधा आहे. यासाठी अशा पात्र महिलेच्या घरात सुरक्षिततेच्या दृष्टीने ४ बाय २ अकाराचा ओटा असणे आवश्यक आहे. येत्या महिन्यात उर्वरित सर्व पात्र महिलांंना सदर योजनेंतर्गत गॅसचे वितरण पूर्ण करण्यात येणार आहे.