शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

महिनाभरात बदलणार गंगाबाईचा चेहरामोहरा

By admin | Updated: June 25, 2016 01:35 IST

बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा आहे. मात्र त्या तुलनेत गंगाबाईला असलेली जागा अपुरी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : विविध प्रकारची १८ कामे सुरूगोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा आहे. मात्र त्या तुलनेत गंगाबाईला असलेली जागा अपुरी आहे. त्या अपुऱ्या जागेतील अर्धी जागा मेडिकल कॉलेजच्या वापरासाठी देण्यात आल्यामुळे वाढलेल्या रूग्णांना त्या ठिकाणी सेवा देण्यास गंगाबाईचे प्रशासन तत्परता दाखवीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाकडे विशेष लक्ष घालून मागच्या वर्षी या रूग्णालयाला ५६ लाख दिले तर यंदा ५० लाख मंजूर केले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा मिळाला. परंतु २०० खाटा ठेवण्यासाठी गंगाबाई स्त्री रूग्णालयात जागा उपलब्ध नाही. त्यातली एक इमारती मेडीकल कॉलेज करीता देण्यात आल्याने आणखीनच अडचण निर्माण झाली आहे. गंगाबाईतील रूग्णांना चांगली सेवा देण्यासाठी येथील प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध कामासाठी निधी मागण्यात आला. ग्रामीण जनतेला आरोग्याचे चांगली सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मागच्या वर्षी ५६ लाख रूपये दिले, तर यावर्षी ५० लाख देण्याचे मान्य केले. या निधीतून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात स्टोअर रूम, अपंगासाठी शौचालय बांधकाम करण्यात येत आहे. हायटेंशन लाईनसाठी पॅनल झोनल तयार होत आहे. सुरक्षा भिंत नवीन तयार करण्यात येत आहे. सुलभ शौचालय दुरूस्त करण्यात आले. पीवर ब्लॉक टाकून गंगाबाई घाणमुक्त करण्याची योजना आखली आहे. अधिक्षक व निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष तयार करण्यात येणार आहे. अपुऱ्या जागेत रूग्णांच्या नातेवाईकांचे तसेच खासगी वाहन आतपर्यंत जाते. त्या वाहनांना प्रवेश बंद करण्यासाठी मोठा गट तयार करण्यात आला आहे. रूग्णांच्या सोयीसाठी सेंट्रल जेल मधून २५ कुलर मागविण्यात आले आहेत. बांधकाम संपताच नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात बाई गंगाबाईचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजीव दोडके यांनी सांगितले.एक्स्प्रेस फिडरच्याही तक्रारीएक कोटी रूपयातून बाई गंगाबाई व केटीएस रूग्णालयासाठी एक्सप्रेस फिडर बसविण्यात आले. परंतु रूग्णालयांमध्ये उपकरणे जास्त असल्यामुळे कधी-कधी विद्युतचा त्रास होतो. यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीला तक्रार केल्यावर वेळीच तक्रारीचा निपटारा होतो. मात्र अनेकदा लाईट जाते. याला गोंदिया शहरात ठिकठिकाणी खडञडे खोदकाम केले जात असल्यामुळे केबल कटल्यास लाईट जाते. एक्स्प्रेस फिडर असूनही कधी कधी लाईट जाते याच्या तक्रारीही बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाकडून करण्यात आल्या आहेत.