शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतींचा ‘गल्ला’ गरम

By admin | Updated: November 18, 2016 01:40 IST

चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा दैनंदिन व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला

अर्जुनी, गोरेगाव : तीन दिवसांत साडेतीन लाख जमा, सडक-अर्जुनीत सर्वच वाऱ्यावरगोंदिया : चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा दैनंदिन व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध करांची रक्कम जुन्या नोटांनी भरण्याची मुभा दिली. त्यामुळे नगर पंचायत, ग्राम पंचायतमधील नागरिक थकित कर भरून आपल्याकडील जुन्या नोटांची विल्हेवाट लावत आहेत. त्यामुळे अर्जुनी मोरगाव व गोरेगाव नगर पंचायतींमध्ये तीन दिवसात जवळपास साडेतीन लाखांचा गल्ला भरला. अर्जुनी मोरगाव : नोटा रद्दबद्दल निर्णयाची अर्जुनी मोरगाव नगर पंचायतमध्ये तीन दिवसात २ लाख ६९ हजार रुपयांचा कराचा भरणा जमा करण्यात आल्याचे नगर पंचायतच्या मुख्याधिकारी किरण बगळे यांनी सांगितले.व्यवहारातून बाद झालेल्या पाचशे व हजाराच्या नोटांचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थाचा कर भरण्यासाठी वापर करता येईल अशा सूचना नगर विकास विभागाला देण्यात आल्या. दैनंदिन व्यवहारातून बाद झालेल्या नोटा कराचा भरणा करण्याच्या माध्यमातून नागरिकांनी उपयोगात आणल्याच्या दिसत आहे. नोटा बंदच्या निर्णयांनी थकीत कर जमा करण्यात एक नामी संधी मिळाली.अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतमध्ये गृह कर, पाणी पट्टी कराची नियमित व थकीत कराचा भरणा करण्यासाठी जनतेनी चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. तीन दिवसामध्ये करापोटी २ लाख ६९ हजार रुपयांचा भरणा आजपर्यंत झाल्याचे सांगण्यात आले.गोरेगावमध्ये ७३,३६० रुपये वसुलीगोरेगाव : गोरेगाव नगर पंचायतची घरकर व पाणीपट्टी करापोटी ३० लाख ३७ हजार ३३० रुपये नागरिकांवर थकबाकी होती. त्यापैकी ७३ हजार ३६० रुपये तीन दिवसात वसुली झाली आहे. जुन्या नोटा बंद झाल्याचे कळताच नागरिकांनी घरकर भरण्याकडे अधिक भर दिला. नगर पंचायतीत जुन्या नोटा घेत असल्यामुळे नागरिकांनी कराचा भरणा करण्यासाठी एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे कधीकाळी कर वसुलीसाठी नगर पंचायत प्रशासनाला नागरिकांच्या घरी चकरा माराव्या लागत असे, पण नोटबंदीच्या फतव्यामुळे नागरिकांना कर भरणे अधिक सोयीचे वाटले. कमी दिवसात एवढी कर वसुली प्रथमच झाल्याचे नगर पंचायत प्रशासनाने सांगितले.सडक अर्जुनी नगर पंचायत वाऱ्यावरसडक-अर्जुनी : जिल्ह्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन करवसुलीसाठी तत्पर असताना प्रथमच नगर पंचायतचा दर्जा मिळालेल्या सडक अर्जुनी नगर पंचायतचा कारभार मात्र वाऱ्यावर आहे. १ हजार ५०० च्या नोटा जमा करायला कार्यालयात कुणीही उपलब्ध नाही. नगराध्यक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अज्ञातवासात दौऱ्यावर तर प्रशासकीय अधिकारी १५ दिवसांपासून सुटीवर आहे. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी जागेवर नाही.८ नोव्हेंबरच्या रात्री १००० व ५०० रुपयांच्या नोटा बंधीचा निर्णय झाल्यानंतर बऱ्याच लोकांची तारांबळ उडाली. लगेच शासनाने टॅक्स भरण्यासाठी एक हजार व पाचशेच्या नोटा चालू शकतात अशा प्रकारच्या सुचना दिल्यामुळे ज्यांच्याजवळ ५०० व १००० च्या नोटा आहे. त्यांनी त्या नोटा टॅक्स करण्यासाठी वापरल्या. परंतु सडक अर्जुनीची नगर पंचायत याकरिता दुदैवी ठरली असल्याचे दिसून आले.विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष रिता लांजेवार आणि इतर १६ नगरसेवक आपली आर्थिक किस्मत आजमावण्यासाठी आपले कार्यक्षेत्र सोडून प्रेक्षणीय ठिकाणी गेले. त्यापैकी फक्त दिनेश अग्रवाल आणि श्रीमती पात्रे मुख्यालयी उपस्थित आहे.याच संधीचा फायदा घेऊन सडक अर्जुनी नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी, नायब तहसीलदार आपली सुटी टाकून गायब झाले. भ्रमणध्वनीवरुन अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. कार्यालयीन कर्मचारी लिपीक सूर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन टॅक्स विषयी माहिती विचारली असता मी नगर पंचायतमध्ये सध्या नाही, मला टॅक्सविषयी माहिती नाही असे उत्तर मिळाले.सडक अर्जुनीच्या नगराध्यक्ष रिता लांजेवार आणि इतर १६ नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, नायब तहसीलदार अटराये, नगर पंचायतमध्ये नसल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यावर कोणाचेही वर्चस्व राहिले नाही. त्यामुळे १००० व ५०० च्या नोटा असून टॅक्स भरणारे नागरिक कार्यालयातून परत गेले. लाखो रुपये टॅक्सची रक्कम जमार होणार होती ती अकार्यक्षमतेमुळे नगर पंचायतच्या खात्यात जमा होवू शकली नाही. प्रशासनाकडून सदर घटनेची चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.२४ पर्यंत स्वीकारणार जुन्या नोटाचलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्विकारण्याची मुदतवाढ येत्या २४ तारखेपर्यंत करण्यात आली आहे. अर्जुनी-मोरगाव नगर पंचायत हद्दीमधील जनतेनी गृह कर व पाणीपट्टी कर (नियमित/थकीत) जुन्या ५०० व १००० रुपयाच्या स्वरुपात भरणा करावा. २४ नोव्हेंबरपर्यंत कराच्या रुपात जुन्या नोटा स्विकारण्यात येणार असल्याचे नगर पंचायतचा कराचा भरणा करण्याचे आवाहन अर्जुनी मोरगावच्या मुख्याधिकारी किरण बगळे यांनी केले आहे.