शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘मटका कोला’ची नि:शुल्क सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:26 IST

उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने वाढत्या उन्हासोबत पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे.

गोंदिया रेल्वे स्थानक : तहानलेल्या प्रवाशांच्या व्याकुळ कंठांना गारवागोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने वाढत्या उन्हासोबत पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. विहिरी व बोअरवेल्समधील पाणी खोलात जात आहे. परंतु गोंदिया रेल्वे स्थानकावर ‘मटका कोला’ची नि:शुल्क जलसेवा आता प्रवाशांची तहान भागविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर तहानलेल्या प्रवाशांच्या व्याकुळकंठांना शीतलता मिळत आहे.श्री रणछोडदास महाराज यांच्या प्रेरणेने सन १९७० मध्ये नगर नागरिक सेवा समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे प्रमुख कुमारभाई माचिसवाले आहेत. त्यांच्या सहकार्याने दरवर्षी गोंदिया रेल्वे स्थानकावर मटका कोला या नि:शुल्क जलसेवेद्वारे प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ही समिती सन १९७० पासून अविरतपणे रेल्वे स्थानकावर पाणी वितरणाची सेवा नि:शुल्कपणे देत आहे.दरवर्षी गोंदिया रेल्वे स्थानकावर तीन ठिकाणी ही नि:शुल्क जलसेवा कार्यरत असून प्रवाशांची तहान भागवित आहे.गोंदिया रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म-३ व ४ वरच्या एका टोकावर थंड पाण्याने भरलेले ३० ते ४० मोठमोठे घडे (नान) ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या टोलावरही थंड पाण्याने भरलेले मटके ठेवण्यात आले आहेत. तिसऱ्या ठिकाणीसुद्धा लवकरच मटका कोला सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी १५ नानची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगर नागरिक सेवा समितीच्या वतीने नि:शुल्क पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.रायपूर ते नागपूर या रेल्वे प्रवासादरम्यान गोंदिया हेच एकमेव असे रेल्वे स्थानक आहे, जेथे प्रवाशांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी उन्हाळ्याच्या दिवसांत नि:शुल्कपणे उपलब्ध करून दिले जाते. या मटका कोलाचे पाणी वितरण करण्यासाठी गोंदिया शहर व लगतच्या ग्रामीण परिसरातील हिवरा, कटंगीकला व इतर गावातील मुले-मुली, महिला व पुरूष येतात. त्यांना नगर नागरिक सेवा समितीकडून आठवडी किंवा मासिक वेतनही दिले जाते.काही जण तहानलेल्यांना पाणी पाजणे म्हणजे पुण्यकार्य आहे, अशी धारणा ठेवून नि:शुल्क पाणी वाटपाचे काम करीत आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावर नि:शुल्क जलसेवेच्या ठिकाणी आळीपाळीने सात जणांना पाणी वितरणासाठी ठेवण्यात आले आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. या नि:शुल्क जलसेवेमुळे गोंदिया रेल्वे स्थानक प्रवाशांना सुपरिचित झाले आहे.रेल्वेगाडीत बसणारे प्रवासी ज्यांना गोंदियात उतरायचे नसते, ते सुद्धा गोंदिया स्थानकावर उतरून आपली तहान भागवितात. तसेच पुढील प्रवासासाठी आपल्या जवळच्या बाटल्या येथील थंडगार पाण्याने भरून नेतात.तेच पाणी त्यांच्या पुढील प्रवासात पिण्यासाठी उपयोगी ठरते.विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर नागरिक सेवा समिती तहानलेल्या प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)