लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारुन त्यातून कुटुंबाला हातभार लावण्यास सुरूवात केली. अशा अनेक यशोगाथा जिल्ह्यात आहेत.तिरोडा तालुक्यातील महिलांनी अदानी फाऊंडेशन व मानव विकास मिशनच्या माध्यमातून व महिला आर्थिक विकास मंडळाच्या सहकार्याने तालुक्यातील ग्राम रामाटोला, टिकारामटोला, मेंदीपूर, गुमाधावडा, गराडा, तिरोडा या गावातील प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासद असलेल्या ६० महिलांनी मागील तीन वर्षापासून अगरबत्ती बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. यातून मिळणाऱ्या रोजगारामुळे त्यांच्या कुटुंबांत आनंदाचा सुगंध दरवळत आहे.प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनी तिरोडाच्या सभासद असलेल्या एकूण ६० महिलांनी व्यवसाय सुरु करताना अदानी फाऊंडेशन व मानव विकास मिशनच्या माध्यमातून ३ महिलांचा एक गट तयार केला. यानंतर त्यांना एक अगरबत्ती बनविण्याची मशीन तसेच ३०० किलो अगरबत्ती मसाला व १०० किलो अगरबत्ती काड्या पुरविण्यात आल्या. तयार केलेल्या अगरबत्तीची विक्रीची व्यवस्था सुद्धा करुन देण्यात आली. एका मशिनद्वारे एका दिवशी ५० ते ६० किलो अगरबत्ती तयार केली जाते. प्रती किलो मागे दहा रुपये याप्रमाणे त्यांना मोबदला मिळतो. सरासरी एक महिला दिवसाला १५० ते २०० रुपये कमवित आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्टीने सक्षम झाल्याने त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा योगदान देत आहेत. पर्यायाने कुटुंबाची धुरा सांभाळत आहेत.ग्रामीण भागातील महिलांमध्ये अनेक कला कौशल्य असून त्यांना चालना दिल्यास त्या चांगली आर्थिक प्रगती साधू शकतात. नेमका हाच धागा पकडून अदानी फाऊंडेशनने त्यांना सहकार्य केल्याने त्यांना प्रोत्साहान मिळत आहे.ऑनलाईन विक्री सुरू करणारमहिलांना सदर व्यवसायातून जास्तीत-जास्त उत्पन्न कसे मिळेल या दृष्टीने अदानी फाऊंडेशन प्रयत्नरत आहे. येत्या महिन्याभरात सुगंधीत अगरबत्ती अॅमेझान व फ्लीप कार्डद्वारे ऑनलाईन विक्री प्रगतीशील शेतकरी महिला कंपनीद्वारा अधिराक्षी या नावाने विक्री केली जाणार असल्याचे अदानी फाऊंडेशनचे हेड नितीन शिराळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अगरबत्ती व्यवसायातून दरवळतोय अनेक कुटुंबात सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST
प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनी तिरोडाच्या सभासद असलेल्या एकूण ६० महिलांनी व्यवसाय सुरु करताना अदानी फाऊंडेशन व मानव विकास मिशनच्या माध्यमातून ३ महिलांचा एक गट तयार केला. यानंतर त्यांना एक अगरबत्ती बनविण्याची मशीन तसेच ३०० किलो अगरबत्ती मसाला व १०० किलो अगरबत्ती काड्या पुरविण्यात आल्या.
अगरबत्ती व्यवसायातून दरवळतोय अनेक कुटुंबात सुगंध
ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचे सहकार्य : ६० कुुटुंबांना मिळतोय रोजगार,देशभर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न