शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या चार गाड्या महिनाभरात होणार बंद

By admin | Updated: August 22, 2015 00:16 IST

बालाघाट ते जबलपूरला जाण्यासाठी नैनपूरपर्यंत नॅरोगेज रेल्वे मार्गाने प्रवास करावा लागतो. परंतु आता या नॅरो गेजला ब्रॉड गेजमध्ये बदलविण्यात येत असल्यामुळे .....

ब्रॉड गेजचे काम : गोंदियावरून जाणाऱ्या प्रवाशांना होणार त्रासगोंदिया : बालाघाट ते जबलपूरला जाण्यासाठी नैनपूरपर्यंत नॅरोगेज रेल्वे मार्गाने प्रवास करावा लागतो. परंतु आता या नॅरो गेजला ब्रॉड गेजमध्ये बदलविण्यात येत असल्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने नोव्हेंबर २०१५ पासून मेगा ब्लॉक जाहीर केला असून चार रेल्वे गाड्या बंद करण्याची घोषणा केली आहे. या प्रकारामुळे बालाघाट-जबलपूर व्हाया नैनपूर या मार्गाने ये-जा करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रानुसार, जबलपूर-नैनपूर, छिंदवाडा-नागपूर, नैनपूर-बालाघाट, छिंदवाडा-नैनपूर (मंडला फोर्ट) या रेल्वे गाड्या बंद करण्यात येणार आहेत. जबलपूर-नैनपूर ही रेल्वेगाडी बंद करण्याची तारिख १ आॅक्टोबर २०१५ असल्याचे रेल्वे मार्ग बांधकाम विभागाने जाहीर केली आहे. छिंदवाडा-नागपूर ही गाडी १ नोव्हेंबर २०१५ पासून बंद करण्याची सूचना बांधकाम विभागाने केली. मात्र रेल्वे प्रशासनाने सदर तारखेत बदल करून १ जानेवारी २०१६ केली. नैनपूर-बालाघाट गाडी बंद करण्याची तारित बांधकाम विभागाने १ डिसेंबर २०१५ ठरविली. तर रेल्वे प्रशासना त्यात बदल करून १ नोव्हेंबर २०१५ अशी निश्चित केली. तसेच छिंदवाडा-नैनपूर (मंडला फोर्ट) ही गाडी १ जानेवारी २०१६ पासून बंद करण्याचे बांधकाम विभागाने ठरविले. तर त्यात बदल करून रेल्वे प्रशासनाने १ डिसेंबर २०१५ असे केले आहे. सद्यस्थितीत सदर संपूर्ण नॅरो गेज मार्गावर २१० कोचेस, ७१ गुड्स वेगन्स आणि ३७ लोकोज उपयोगात आणले जात आहेत. मात्र हे नॅरो गेज बंद झाल्यावर तीन गाड्यांसाठी ३५ कोचेसची गरज राहणार आहे. (प्रतिनिधी)रेल्वे विद्युतीकरण व तिसरा ट्रॅकगोंदिया ते चंद्रपूर या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणासाठी वायरिंग पूर्ण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय इतर काही कामे शिल्लक असल्यामुळे सदर मार्गावरून विद्युत ट्रेन कधी धावेल, हे निश्चितपणे सांगणे कठिण आहे. तसेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालगाड्या धावत असतात. या कारणामुळे रेल्वे गाड्या विलंबाने धावणे ही नित्याचीच बाब होती. आता या मार्गावर तिसऱ्या ट्रॅकचे काम जोरात सुरू असून सदर काम राजनांदगावच्या जवळपासपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.एस्कलेटर व लिफ्ट प्रलंबितचसहा महिन्यांपूर्वी खा.नाना पटोले यांच्या हस्ते गोंदिया स्थानकाच्या प्लॅटफॉर्म-१ वर शेड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी गोंदिया स्थानकात एस्कलेटर व लिफ्टची सोय करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. मात्र बराच कालावधी लोटूनही एस्कलेटर व लिफ्टच्या कामाचा शुभारंभदेखील करण्यात आला नाही. काम कुठे अडले, याबाबत कुणीही काही सांगत नाही. केवळ होम प्लॅटफॉर्मवर शेडचे काम सुरू असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. या प्रकारामुळे अवघ्या सहा महिन्यात वृद्ध व अपंगांसाठी उपलब्ध होवू शकणारी एस्कलेटर व लिफ्टची सुविधा आता केव्हा उपलब्ध होणार? हे सांगणे कठिण झाले आहे.