शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचे चार ट्रॅक्टर पकडले

By admin | Updated: April 9, 2017 00:06 IST

परिसरामध्ये होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा बसावा, शासकीय महसूलामध्ये वाढ व्हावी या हेतूने

४६ हजारांचा दंड : अवैध वाहतूक करणाऱ्यांना धक्का अर्जुनी मोरगाव : परिसरामध्ये होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा बसावा, शासकीय महसूलामध्ये वाढ व्हावी या हेतूने तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी महसूल विभागाच्या सहकाऱ्यांसह धाड मोहीम सुरू केली. शुक्रवारी (दि.७) रात्री १ च्या दरम्यान केशोरी परिसरात गस्ती घालत असताना अवैधपणे रेती घाटावरुन ट्रॅक्टरद्वारे रेती भरुन वाहतूक करीत असताना ४ ट्रॅक्टर पकडले. त्यांच्याकडून ४६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्यरात्री ट्रॅक्टरवर ही कारवाई करण्यात आल्याने अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतली आहे. तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रेती घाटावरुन अवैध वाहतूक होऊ नये म्हणून तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारच्या रात्री १ वाजेच्या दरम्यान बोंबार्डे यांच्यासह नायब तहसीलदार कोकवार, तलाठी हरिणखेडे, केशोरी परिसरात गस्ती घालत होते. केशोरी येथील नक्टी घाटावरुन रेती वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना अवैधपणे खुलेआम रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यांनी केशोरी परिसरात आपल्या पाळत ठेवली. दरम्यान घाटावरुन अवैधपणे रेती भरुन आलेले ४ ट्रॅक्टर त्यांनी पकडले. गौण खनिजाची अवैधपणे वाहतूक करणारे प्रतापगड येथील रमेश राऊत (ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५, डी ३९७५), महागावचे दुधराम लंजे (एमएच ३५ डी ८५७८), सुनील डोंगरवार (एमएच ३५ एपी ३०५७) आणि गोपी देशमुख या ट्रॅक्टर मालकांवर अवैधपणे गौण खनिजांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करुन त्यांच्याकडून ४६ हजार २०० रुपये दंडात्मक वसुल करण्यात आले. तहसीलदाराच्या या कारवाईने अवैधपणे रेती चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)