शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांत अतिवृष्टी

By admin | Updated: July 9, 2016 01:57 IST

गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शुक्रवारी अनेक भागात ....

जिल्हाभर संततधार : आमगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, गोरेगावात पाणीच पाणीगोंदिया : गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शुक्रवारी अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ५८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आमगाव, सडक अर्जुनी, सालेकसा व गोरेगाव तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे तिथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.जिल्ह्यात १ जून ते ८ जुलै २०१६ या कालावधीत सरासरी २८३.९ मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवार ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात ८५.८ मिमी, आमगाव तालुक्यात ६९.३ मिमी, सालेकसा तालुक्यात ९३ मिमी आणि सडक-अर्जुनी तालुक्यात ७६.८ मिमी पाऊस पडल्याने या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा आहे. त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका २८७.५ मिमी (४१.१), गोरेगाव तालुका २५७.४ मिमी (८५.८), तिरोडा तालुका २३०.६ मिमी (४६.२), अर्जुनी-मोरगाव तालुका १९१.६ मिमी (३८.३), देवरी तालुका १८६ मिमी (६२), आमगाव तालुका २७७.२ मिमी (६९.३), सालेकसा तालुका २७९ मिमी (९३) व सडक-अर्जुनी तालुक्यात २३०.५ मिमी (७६.८) पाऊस पडला आहे. यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पाऊस गोंदिया तालुक्यात तर सर्वात कमी देवरी तालुक्यात झाल्याचे दिसून येते.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैच्या सकाळी ८.३० वाजतापर्यंत काही भागात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जनतेने सतर्क राहून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू असल्यामुळे काही छोट्या नाल्यांना पूर आला. त्यामुळे एसटीच्या काही गाड्यांना माघारी फिरावे लागले. (प्रतिनिधी)धरणांचे बूड झाकलेयावर्षी उन्हाळ्यात अनेक मोठे जलाशय कोरडे झाले होते. गेल्या आठवडाभरातील पाण्यामुळे मोठ्या धरणांमध्ये काही प्रमाणात पाणी साचले आहे. त्यात ३१८.८५ दलघमी क्षमतेच्या इटियाडोह धरणात ४९.२५, शिरपूर जलाशयात (क्षमता १९२.५६ दलघमी) १८.६१ दलघमी, पुजारीटोला धरणात (क्षमता ४८.६९ दलघमी) ४.०६ दलघमी, कालीसराडमध्ये (क्षमता २७.७५ दलघमी) साठा निरंक आहे. याशिवाय संजय सरोवराची क्षमता ४१० दलघमी असून आजचा साठा ३६.८८ दलघमी आहे.रोवणीला खोळंबायावर्षी पाऊस लांबल्यामुळे भातपिकाची नर्सरी आणि पर्यायाने रोवणीही खोळंबली होती. परंतू गेल्या आठवडाभरापासून दररोज येत असलेल्या पावसाच्या सरींमुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीला जेमतेम सुरूवात केली होती. परंतू गुरूवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुन्हा रोवण्या खोळंबल्या आहेत.