शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत चोरी करणारे चौघे गजाआड ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

गोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले ...

गोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.

जिल्हयातील मालमत्ता चोरी व घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे गस्त केली असता २० मे रोजी कुंभारटोली येथील राजकुमार अमयकुमार (३०), सुरेश धनराज राऊत (३१), राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) व एक अल्पवयीन बालक अशा चौघांना अटक करण्यात आली. अभयकुमार यांच्या कुंभारटोली येथील बंद असलेल्या धिती हॉटेलमध्ये त्याने ते साहित्य ठेवले होते. या एक एलएफडी टिव्ही, लाकडी कॅरेम बोर्ड, संगणक मॉनीटर, सीपीयू, म्युजीक सिस्टम असा एकूण ४८ हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या आरोपींनी ऑक्टोंबर २०२० व मार्च २०२१ मध्ये दोन वेळा रात्री चोरी केली. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसात भादंवि कलम ४६१,३८०अन्वये गुन्हा दाखल आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार राजेश बडे, अर्जुन कावळे, विठठलप्रसाद ठाकरे, चेतन पटले, नेवालाल भेलावे, पंकज खरवडे यांनी केली आहे.