शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसीकरणाचा चार लाखांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी अवघ्या देशात सुरू असलेली लसीकरणाची चळवळ जोम धरत असून, त्यानुसार जिल्ह्यातही आता लसीकरणाने वेग ...

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी अवघ्या देशात सुरू असलेली लसीकरणाची चळवळ जोम धरत असून, त्यानुसार जिल्ह्यातही आता लसीकरणाने वेग धरला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांचेच फलित आहे की, जिल्ह्याने लसीकरणात चार लाखांचा टप्पा पार केला आहे. शनिवारपर्यंत (दि.२६) जिल्ह्यातील ४०५९१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात जिल्ह्याने राज्यस्तरावरही उत्कृष्ट कामगिरी केल्याचीही नोंद घेण्यात आली आहे.

दुसऱ्या लाटेने केलेला कहर बघता तज्ज्ञांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार अवघ्या देशातच लसीकरणाची मोहीम आता एक च‌ळवळ म्हणून राबविली जात आहे. त्या चळवळीची आग आता जिल्ह्यातही पोहोचली असून जिल्ह्यात लसीकरणाने आता पूर्वीच्या तुलनेत चांगलाच जोम धरला आहे. शनिवारपर्यंतची जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी बघता ४०५९१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावरून आता नागरिक स्वत:च लसीकरणाचे फायदे बघता पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यात जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणासाठी केंद्रे वाढवून देण्यात आल्याने नागरिकांची सोय होत आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात सुरुवातीपासूनच ४५-६० वर्गातील नागरिक पुढे असून, आतापर्यंत १८४०७६ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले आहे. यात १४८७२० नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, ३५३५६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे, तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या गटात ११३०१० नागरिकांनी लस घेतली असून, यात ८५७५९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर २७२५१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

-----------------------

१८-४४ चा गट जोमात

केंद्र शासनाने २१ जूनपासून १८ वर्षांपुढे सर्वांनाच लस देण्यास परवानगी दिली होती. मात्र, राज्य शासनाने त्यात बदल करीत ३० वर्षांपासून परवानगी दिली असून, त्यानुसार लसीकरण सुरू आहे. विशेष म्हणजे, तरुण व युवांचा हा गट सुरुवातीपासूनच लसीकरणाची वाट बघत होता व त्यांच्यात जास्त उत्सुकता होती. ही उत्सुकता आता लसीकरणात दिसत असून, आतापर्यंत ५५६५४ युवांनी लस घेतल्याचे दिसत आहे. यामध्ये ४८९९२ युवांनी पहिला डोस घेतला असून, ६६६२ युवांनी दुसरा डोस घेतला आहे.

----------------------------

लसीकरणाची चळवळ पोहोचली ग्रामीण भागात

कोरोना लसीला घेऊन नागरिकांत काही भ्रम निर्माण झाले होते व त्यामुळेच त्यांना लस घेण्यास भीती वाटत होती. यामुळेच लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर व लसींवरील अभ्यासातून पुढे आलेले तथ्य बघता नागरिकांच्या मनातून आता लसींबद्दलची भीती व भ्रम निघत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, देवरीसारख्या आदिवासीबहुल भागातही लसीकरणाला गती येताना दिसत आहे. शिवाय अन्य तालुक्यांतील ग्रामीण भागातही लसीकरणाची संख्या वाढत आहे.