शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांची कमाई ८४.५० लाख

By admin | Updated: November 16, 2016 01:14 IST

कर थकबाकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया नगर पालिकेच्या तिजोरीत कोणत्याही विशेष परिश्रमाशिवाय शहरातील नागरिक

गोंदिया पालिकेला ‘अच्छे दिन’ : १० दिवसांत आणखी आवक वाढणारगोंदिया : कर थकबाकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया नगर पालिकेच्या तिजोरीत कोणत्याही विशेष परिश्रमाशिवाय शहरातील नागरिक आपला थकीत कर भरत आहेत. नोटाबंदीनंतर ५०० आणि १००० च्या नोटांमधून न.प.चा मालमत्ता कर भरण्यास शासनाने मुभा दिल्यानंतर दि.११ ते १४ या चार दिवसात ८४.५० लाख रुपयांचा कर नगर पालिकेकडे जमा झाला. ही मुदत आणखी १० दिवस वाढल्यामुळे अवघ्या पंधरवड्यात गोंदिया पालिकेला दोन कोटींची कमाई होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.शासनाने ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातच सध्या दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. यात कुणी जुन्या नोटा बदलवून घेण्यासाठी किंवा त्यांना वापरण्याची कसरत करीत आहेत, तर कुणी नवीन नोटा मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत. खरी कसरत मात्र ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ५०० व १००० रूपयांच्या नोटा आहेत त्यांची सुरू आहे. चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा कुणी स्वीकारत नसल्याने त्या नोटांना चालवून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशात शासनाने शासकीय कार्यालयांना कर स्वरूपात जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले. यामुळे जुन्या नोटांचा वापर कर भरणा स्वरूपात केला जात आहे. नेमका याचाच फायदा नगर परिषदेला मिळाला. अगोदर ११ नोव्हेंबर रोजी जुन्या नोटा कर स्वरूपात स्वीकारण्याचे आदेश आले होते. त्या दिवशी मध्यरात्री १२ वाजतापर्यंत नगर परिषदेने जुन्या नोटा स्वीकारल्या. त्यात पालिकेला ३३ लाख रूपयांची आवक झाली. यात मालमत्ता करापोटी पालिकेला २२ लाख तर बाजार किरायातून ११ लाख रूपये मिळाले. त्यानंतर शासनाने आणखी तीन दिवसांची मुदतवाढ करून दिली. यात १२ नोव्हेंबर रोजी पालिकेला मालमत्ता करापोटी तीन लाख ५० हजार रूपये व बाजार किरायातून दोन लाख रूपये असे एकूण पाच लाख ५० हजार रूपये मिळाले. १३ नोव्हेंबर रोजी मालमत्ता करातून १२ लाख रूपये व बाजार किरायातून चार लाख रूपये असे एकूण १६ लाख रूपये मिळाले. तर १४ नोव्हेंबर रोजी मालमत्ता करातून २५ लाख रूपये व बाजार किरायातून पाच लाख रूपये असे एकूण ३० लाख रूपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे यात ११ नोव्हेंबर रोजी म्हणजेच्या पहिल्या दिवशी ३३ लाख व अंतिम दिन १४ नोव्हेंबर रोजी ३० लाख रूपयांची आवक झाली असून एकूण ८४ लाख ५० हजार रूपये पालिकेच्या तिजोरीत आले आहेत. (शहर प्रतिनिधी)२४ तारखेपर्यंत मुदतवाढ ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी शासनाकडून चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असतानाच आता त्यात आणखी १० दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांना येत्या २४ तारखेपर्यंत जुन्या नोटा स्वीकारता येणार असून तसे आदेश आले आहेत. चार दिवसांच्या या मुदतवाढीमध्ये पालिकेच्या तिजोरीत ८१.५० लाख रूपये आल्याने येत्या १० दिवसांत त्यात आणखी भर पडून जवळपास दोन कोटींची थकित करवसुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वसुली कर्मचारी थकबाकीदारांकडे जाणारथकबाकीदारांकडून कराचा भरणा करण्यासाठी जुन्या ५०० व १००० च्या नोटांचा वापर होत असल्याने यात नगर परिषद व थकबाकीदार अशा दोघांचाही फायदा आहे. त्यामुळे पालिका उर्वरीत थकबाकीदारांना कराचा भरणा करण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहे. यासाठी नगर परिषदेचे कर वसुली कर्मचारी आपापल्या वॉर्डातील थकबाकीदारांकडे जाणार आहेत. हे कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन त्यांना मिळालेल्या अवधीत कराचा भरणा करण्यासाठी प्रोत्साहीत करतील. थकबाकीदारांच्या सुविधेसाठी वाढविण्यात आलेल्या १० दिवसांत रात्री ८ वाजतापर्यंत पावती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.