शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

नगर पंचायतीच्या दर्जासाठी प्रारूप

By admin | Updated: May 20, 2014 23:42 IST

लोकसंख्येच्या प्रमाणात विकासाची गती मिळावी यासाठी शासनाने मागील हिवाळी अधिवेशनात राज्यातील १३८ ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आला.

अधिसूचना निघाली

यशवंत मानकर - आमगाव

लोकसंख्येच्या प्रमाणात विकासाची गती मिळावी यासाठी शासनाने मागील हिवाळी अधिवेशनात राज्यातील १३८ ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आला. यासंबंधी शासनाने प्रारुप अधिसूचना काढली आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या निवडणूकपूर्वी ग्रामपंचायतींवर पुढील दोन महिन्यात प्रशासक नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायतअंतर्गत वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गाव विकासाचे महत्वपूर्ण धोरण ठेवत यासाठी राज्यातील १३८ ग्रामपंचायतींना हिवाळी अधिवेशनात नगर पंचायत देण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. या निर्णयाने सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले होते. राज्यातील ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने प्रारुप अधिसूचना नगर विकास विभाग मंत्रालयाने काढली. याविषयी विविध महत्वपूर्ण बाबींचा समावेशासंबंधी व प्रारुप अधिसूचनेसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरंसने मुख्य सचिवांनी मार्गदर्शन केले. यात विविध बाबी अंतर्भूत व्हावी यासाठी अधिसूचना काढण्यात आली. शासनाकडून नगर पंचायतींच्या प्रारुप अधिसुचनेवर नागरिकांकडून अभिप्राय मागण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे हे संक्रमणात्मक क्षेत्रातील लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, संक्रमित गावापासून नगर पंचायतीचे अंतर, नगर पंचायतीमध्ये संक्रमिक ग्रामपंचायत, नगर पंचायतीचा दर्शक नकाशा व ग्रामपंचायतचे अभिप्राय मागविण्यात आले आहे. सदर प्रारूप अधिसूचनेप्रमाणे नगर पंचायत संबंधीची माहिती संबंधित ग्रामपंचायतने ६ जूनपर्यंत शासनाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासंबंधी पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यात नव्याने १३८ ग्रामपंचायत पुढे नगर पंचायतीचा दर्जा स्विकारण्यात सक्षमपणे पुढे आले आहेत. गावपातळीवरुन थेट नगर पंचायतचा कारभार येणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे. नव्याने गठित होणार्‍या नगर पंचायतमध्ये गोंदिया जिल्ह्यातील सहा तालुका समाविष्ट करण्यात आले आहे. यात अनेकांनी नगर पंचायतच्या अधिसुचनेला पाठिंबा देत शासनाला अभिप्राय पाठविले आहे. त्यामुळे पुढील जुनमध्ये शासनस्तरावर राज्यातील १३८ नगर पंचायतमध्ये गोंदिया जिल्ह्यातील आमागव, गोरेगाव, देवरी, सालेकसा, सडक/अर्जुनी, मोरगाव अर्र्जुनी या तालुका मुख्यालय आता ग्रामपंचायतपासून नगर पंचायतीचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे या तालुक्याच्या नगर पंचायतीमधील निवडणूक पूर्ण प्रशासकांच्या हालचालींना वेग आला आहे.